मराठा आरक्षण : मागील सरकारने नेमलेलेच वकील, मात्र रोहतगींच्या गैरहजेरीची कल्पना नाही : छगन भुजबळ

रोहतगी का गैरहजेर राहिले याची कल्पना नाही. हे सरकार मराठा समाजाच्या मागे उभे असल्याचंही छगन भुजबळ यांनी सांगितलं. 

मराठा आरक्षण : मागील सरकारने नेमलेलेच वकील, मात्र रोहतगींच्या गैरहजेरीची कल्पना नाही : छगन भुजबळ

मुंबई: मागील सरकारने नेमलेलेच वकील, मात्र रोहतगीच्या गैरहजेरीची कल्पना नाही, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्यावर सुनावणी झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ बोलत होते. मागच्या सरकारनं नेमलेलेच सर्व वकील आहेत. रोहतगी का गैरहजेर राहिले याची कल्पना नाही. हे सरकार मराठा समाजाच्या मागे उभे असल्याचंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.  (chhagan bhujbal on maratha reservation)

दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या सुनावणी वेळी राज्य सरकारचा एकही वकील उपस्थित नव्हता. हे दुर्दैवी असून गंभीर आहे. त्यामुळे अशोकराव, तुम्ही जिथे असाल तिथून कोऑर्डिनेट करा आणि कोर्टात वकिलांना हजर राह्यला सांगा, अशी कळकळीची विनंती भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधताना संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना ही विनंती केली. सरकारी वकील कुठे आहेत? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाकडून केला जातो आणि तिथे वकील उपस्थित नसतात हे दुर्देव आहे. गंभीर आहे. त्यामुळे अशोकराव जिथे कुठे असतील त्यांनी कृपया कोऑर्डिनेट करा, असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं.
मराठा समाजाला गृहित धरू नका, त्यांच्याशी खेळखंडोबा करू नका. सरकारचं हे वागणं बरोबर नाही. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. त्यांना आरक्षण मिळावं म्हणून वकिलांना कोर्टात पाठवा. आमचा वकिलांवर पूर्ण विश्वास आहे, त्याबद्दल काहीही दुमत नाही. पण आपली बाजू तिथे मांडणं महत्त्वाचं आहे, असंही ते म्हणाले.
मराठा आरक्षण हा विषय गांभीर्याने घ्या. त्यातील बारकावे समजून घ्या हे, मी सरकारला नेहमी सांगितलं आहे. जे कोणी सामान्य विभागाचे जे कोणी सचिव असतील त्यांनी याचा फॉलोअप घेणं गरजेचे आहे. काही तरी तांत्रिक घोळ झाला आहे, असे माझ्या कानावर आले आहे. पण त्यातही आपल्याकडे वेळ आहे. आपण दुरस्ती करु शकतो. जर पुढच्या सुनावणीत कोणी हजर राहिलं नाही तर हा मॅसेज चुकीचा जाईल. त्यामुळे सरकाराला माझी विनंती पूर्वक सूचना आहे की ताबडतोब जी चूक झाली ती दुरुस्त करा, अशी कळकळीची विनंतीही त्यांनी राज्य सरकारला केली.
मी बोलून बोलून थकलोय
मी कित्येक वेळा बोलायचं. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरत असतो. जालना, कोल्हापूर, मुंबई नवी मुंबईत या ठिकाणी होतो. मी आता बोलून बोलून थकलो आहे. मी गर्दीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरत आहे. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व समाजासाठी करत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने काही तरी पावलं उचलावीत, एवढीच माझी विनंती आहे. मी थकलोय, असा उद्वेगही संभाजीराजेंनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या:

Maratha Reservation | अशोक चव्हाणांना फोन करुन काय करायचं, त्यांना या गोष्टी माहिती नाही?; खासदार संभाजीराजे संतापले

मी कित्येक वेळा माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरतो, मी थकलोय : खासदार संभाजीराजे

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोरच मराठा आरक्षणाची सुनावणी करा; याचिकाकर्ते ठाम

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *