राज्यातले मंत्रीच बलात्कारी; बलात्कारी मंत्र्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न, चित्रा वाघ यांचा घणाघात

राज्यातले मंत्रीच बलात्कारी झालेत आणि प्रत्येक जण या बलात्कारी मंत्र्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतंय, त्यांना शक्ती देतंय, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर प्रहार केलाय

  • राहुल झोरी, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 21:36 PM, 22 Feb 2021
राज्यातले मंत्रीच बलात्कारी; बलात्कारी मंत्र्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न, चित्रा वाघ यांचा घणाघात
चित्रा वाघ, भाजप नेत्या

मुंबईः टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. राज्यातले मंत्रीच बलात्कारी झालेत आणि प्रत्येक जण या बलात्कारी मंत्र्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतंय, त्यांना शक्ती देतंय, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर प्रहार केलाय, पुण्यात त्या पत्रकारांशी बोलत होत्या. (Minister In The State Is The Rapist; Attempts To Save Rapist Ministers Says Chitra Wagh )

पुणे पोलिसांची भूमिका पहिल्यापासून संशयास्पद: चित्रा वाघ

पुणे पोलिसांची भूमिका पहिल्यापासून संशयास्पद आहे. प्रत्यक्षदर्शींच्या केलेल्या चौकशीचे पुढे काय झाले. मोबाईल, लॅपटॅापचं काय झालं माहीत नाही. संजय राठोड हा आरोपी फरार असताना अहवाल दिलाच कसा?, असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय.

आधी त्यांची चौकशी करा आणि मुसक्या आवळाः चित्रा वाघ

संजय राठोडच्या चौकशीशिवाय अहवाल पूर्ण होऊ शकत नाही. आधी त्यांची चौकशी करा आणि मुसक्या आवळा. सगळ्या पुराव्यांची साखळी समोर आली तरी मात्र आरोपी सापडत नाही. मला अजूनही वाटतं राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. बंजारा समाज हा संजय राठोड यांच्यासोबत नाही. समाजातील अनेक जणांचे मला फोन येत असून, पूजाला न्याय मिळवून द्या, असं सांगत आहेत. आम्ही आपल्या सोबत आहोत. मंत्र्यांच्या संपर्कात असणारा एक मंत्री पोलिसांना सापडत नसल्याचं सांगत पोलिसांच्या तपासावरही चित्रा वाघ यांनी संशय व्यक्त केलाय.

…तर राठोड यांचा पत्ता द्यावा

मागील अनेक दिवसांपासू पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं जातंय. या प्रकरणातल्या ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्यानंतर त्यातला आवाज संजय राठोड यांचाच आहे, असा दावा चित्रा वाघ यांनी यापूर्वी केला होता. त्यांनतर राठोड यांच्या अटकेची मागणीसुद्धा त्यांनी केली होती. मात्र संजय राठोड अद्यापही माध्यमांसमोर न आल्याने अनेक प्रश्न निर्माण होतायत.

अहवालावर प्रश्नचिन्ह

दरम्यान, पूजा चव्हाणचा मृत्यू होऊन बराच काळ लोटला असला तरी, हे प्रकरण भाजपने लावून धरले आहे. पूजाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी भाजपने सरकारवर धारेवर धरलं होतं. त्यांनतर तपासाची सूत्रं हालली होती. त्यांनतर पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पोलीस महासंचालकांनी राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य सरकारला अहवाल सादर केला होता. मात्र, या अहवालावरही चित्रा वाघ यांनी आक्षेप नोंदवला होता. वन मंत्री संजय राठोड यांची चौकशी न करता हा अहवाल केलाच कसा? असा सवाल त्यांनी केला होता. तसेच, संजय राठोड यांची चौकशी होत नाही, तोपर्यंत या अहवालाला काडीचीही किंमत नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

इतर बातम्या :

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

minister in the state is the rapist; Attempts to save rapist ministers says Chitra Wagh