मिशन मुंबई, उद्धव ठाकरेंची सलग दुस-या दिवशी बैठक, शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत खलबतं

शिवसैनिकांनी घरोघरी संपर्क वाढवला पाहिजे, सेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. (cm Mission Mumbai )

मिशन मुंबई, उद्धव ठाकरेंची सलग दुस-या दिवशी बैठक, शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत खलबतं

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज वर्षा बंगल्यावर मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपविरोधात शिवसेनेनं नवी रणनीती आखली आहे. शिवसैनिकांनी घरोघरी संपर्क वाढवला पाहिजे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. (Mission Mumbai, Uddhav Thackeray’s Meeting For The Second Day Shivsainik)

नव मतदारांची नोंदणी करून घेण्याचेही आदेश यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच जनतेच्या हिताच्या नवनवीन योजना राबवा, मी तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सध्या भाजपच्या पूनम महाजन आहेत. त्याच मतदारसंघात आता शिवसेना पक्ष मजबूत करण्याची रणनीती आखत आहे.

या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार दिलीप लांडेंनीही माध्यमांशी संवाद साधला आहे. छोटीशी बैठक घेतली म्हणजे रणनीती होत नाही. दिवाळीनिमित्त चहापानासाठी बोलावलं होतं, असंही दिलीप लांडेंनी सांगितलं आहे. शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, ज्यांच्या आशीर्वादाने हे झालं आहे, त्यांच्यापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत, यासाठी बैठक झाली आहे.(Mission Mumbai, Uddhav Thackeray’s Meeting For The Second Day Shivsainik)

मोर्चे बांधणी नाही तर शिवसेना संघटना बांधणी करणार आहे. आमच्यामुळे काही लोक तिकडे दिसत आहेत, त्यांची जागा येत्या निवडणुकीत दाखवून देणार आहोत. आम्ही सैनिक आहोत आणि त्यासाठी आम्हाला सज्ज राहायचं आहे. युद्ध आम्ही जिंकणारच, असा विश्वासही दिलीप लांडेंनी व्यक्त केला आहे.

पालिका निवडणुकीसाठी कामाला लागा- उद्धव ठाकरे

दरम्यान, विरोधक काय बोलतात त्याकडे लक्ष देऊ नका. त्यांचा समाचार घेण्यास आम्ही सक्षम आहोत. तुम्ही महापालिकेच्या कामाला लागा. जय्यत तयारी करा, असे आदेशच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दिले होते. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकले आहे. तसेच मनसेसोबत युती करण्याचे संकेतही भाजपने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी आज शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती.

या बैठकीत त्यांनी पदाधिकारी आणि आमदारांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. तसेच प्रत्येकाच्या मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांनी कोरोना संकटात केलेल्या कामाचं कौतुक करून आमदार आणि पदाधिकाऱ्यांचं मनोधैर्य वाढवलं. या वर्षात कोरोनाच्या संकटामुळे जनतेच्या विकासाचं काम करता आलं नाही. पण आता कोणतंही संकट येवो. काम करायचं. स्वत:ची काळजी घेऊन जनतेची कामं करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं शिवसेनेचे चेंबूरमधील आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी सांगितलं होतं.

(Mission Mumbai, Uddhav Thackeray’s Meeting For The Second Day Shivsainik)

संबंधित बातम्या:

LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेची मुंबई महापालिका निवडणुकीची खलबतं

“भगव्याचा रंग तुम्हीच फिका केला”, फडणवीसांनंतर आशिष शेलारांचाही शिवसेनेवर हल्लाबोल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *