मेट्रो कारशेड बुलेट ट्रेनच्या शेजारी हलवा, पर्यावरणप्रेमींच्या प्रस्तावाने भाजपची धाकधूक

पर्यावरणप्रेमींनी केल्यानं भाजपची धाकधूक वाढली आहे. Move The Metro Carshed Next To The Bullet Train, BJP Push At The Suggestion Of Environmentalists

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:37 PM, 17 Dec 2020
मेट्रो कारशेड बुलेट ट्रेनच्या शेजारी हलवा, पर्यावरणप्रेमींच्या प्रस्तावाने भाजपची धाकधूक

मुंबईः मेट्रो कारशेडवरून शह-काटशहाचं राजकारण केलं जात आहे. मेट्रोची कारशेड आरे येथे नेल्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ते मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्यात आलं आहे. तोच वाद आता कोर्टापर्यंत पोहोचला आहे. त्यातच आता मेट्रो कारशेड कलिना आणि बीकेसीमध्ये हलवावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केल्यानं भाजपची धाकधूक वाढली आहे. (Move The Metro Carshed Next To The Bullet Train, BJP Push At The Suggestion Of Environmentalist)

मेट्रोच्या कारशेडच्या लोकेशनसाठी कांजूरमार्ग निवडलं गेलं होतं. यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. उच्च न्यायालयाकडून या ऑर्डरवर स्टे आला आहे. मेट्रोच्या कारशेडचं प्रकरण राज्य आणि केंद्र सरकारनं बसून सोडवलं पाहिजे. कलिना आणि बीकेसीमध्ये मेट्रो कारशेडसाठी पर्याय आहेत. एमएमआरसीएला जर कारशेड तयार करायचेच असेल तर कलिना आणि बीकेसीमध्ये मेट्रो कारशेड बनवून एक लाइन तयार केली जाऊ शकते. 2011मध्ये मेट्रो 3 चा जो प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये या दोन जागांचा उल्लेख असल्याचंही पर्यावरणप्रेमी अमृता भट्टाचार्य यांनी सांगितलं. त्यामुळे भाजपची धाकधूक वाढली आहे.

भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीसुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. मेट्रोची कारशेड आरे येथे नेण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ही कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याची काही आवश्यकता नव्हती, तेथे नेण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्ष जागा ताब्यात घेण्यापूर्वीच मशिनरीसुद्धा कांजूरमार्ग येथे हलविण्यात आली. त्यावर सुमारे दीडशे कोटी रुपयांचा खर्च झाला.
बुलेट ट्रेन हा मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. म्हणून केवळ शहला-काटशहानं प्रत्युत्तर देण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की, एकमेकांवर चिखलफेक करताना मुंबईकरांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला दिरंगाई करण्यात येऊ नये. त्यासाठी विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष आणि मुंबईतील या क्षेत्रातील काही तज्ज्ञ यांनी एकत्रित येऊन कोणालाही अडचण होणार नाही, अशी जागा शोधली पाहिजे.

मुंबईकरांसाठी हा प्रकल्प एका निश्चित वेळेत पूर्ण केला पाहिजे- प्रवीण दरेकर

मुंबईकरांसाठी हा प्रकल्प एका निश्चित वेळेत पूर्ण केला पाहिजे. कारण मुंबईकरांना प्रवासासाठी आणि वाहतुकीसाठी सध्या अडचण होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वाद-विवादामुळे मुंबईकर व्यथित झाला आहे, त्यामुळेच जागेचा सोक्षमोक्ष लावावा. सरकारने कांजूरमार्गचा डीपीआर बनवला असेल आणि आता पुन्हा एकदा बुलेट ट्रेनची वांद्र्याची जागा तुम्ही घेण्याचा विचार करत आहात, त्यामुळे आता बुलेट ट्रेनसाठी जी प्रक्रिया पूर्ण झाली असेल ती वाया जाणार आहे. पुन्हा त्यासाठी नवीन डीपीआर करावा लागेल, त्यामुळे सरकारला मुंबईकरांना खरंच मेट्रो रेल देण्याची इच्छा आहे का, असा सवाल विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या

Mumbai Metro Car Shed News and Updates | उद्धव ठाकरे माफी मागा, आदित्य ठाकरे राजीनामा द्या, भाजप आक्रमक