BMC Election 2022 Avdhoot Nagar Ward No 2 : वॉर्ड नंबर दोनमध्ये विद्यमान नगरसेवकांची महिला आरक्षणामुळे गोची

BMC Election 2022 Ward No 2 : वॉर्ड क्रमांक 2मध्ये असलेल्या सर्व नगरसेवकांची गोची झाली. कारण हा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित केला गेला.

BMC Election 2022 Avdhoot Nagar Ward No 2 : वॉर्ड नंबर दोनमध्ये विद्यमान नगरसेवकांची महिला आरक्षणामुळे गोची
महिलांसाठी आरक्षितImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 1:20 AM

BMC Election 2022 Ward No 2 मुंबई : मुंबई महापालिकेचा वॉड क्रमांक दोन (BMC Ward No. 2) आणि या वॉर्डमधील राजकीय स्थिती काय होती, यावरुनच येणारी स्थिती काय असेल, याचं भविष्य ठरेल. मुंबई महानगर पालिका ही आशियातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका. त्यामुळे या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे (Mumbai Election) सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. मुंबई महानगर पालिकेच्या वॉर्ड क्रमांक दोनमध्ये 2017 साली काय घडामोडी घडल्या होत्या? 2022पर्यंतच्या मधल्या काळात घडलेल्या बहुतांश गोष्टी या वॉर्डचं भवितव्य अधोरेखित करणार आहे. या वॉर्डमध्ये नेमका कोणकोणता भाग मोडतो? मुंबईचा वॉर्ड क्रमांक दोन आहे कुठे आणि तो नव्या रचनेनुसार आरक्षित झाला आहे का? वॉर्ड क्रमांक दोन मध्ये काही बदल झालाय का? या गोष्टी जाणून घेणार आहोत. मुंबई महानगरपालिकेची 2022ची निवडणूक (BMC Election 2022) रंगतदार होणार आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर होणारी बीएमसीची ही पहिलीच निवडणूक आहे. शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारतं? भाजप आणि शिवसेनेत तर या निवडणुकीत थेट लढत होतेच आहे. पण पालिकेच्या वॉर्डातील राजकारण नेमकं कसं काम करतं, त्यावरही अनेक वॉर्डांचे निकाल निर्भर आहेत. चला तर जाणून घेऊयात मुंबईच्या वॉर्ड क्रमांक दोन बद्दल…

वॉर्ड नंबर 2 मध्ये नेमका कोणकोणता भाग मोडतो?

अवधूत नगर, आनंद नगर, एनएल कॉम्पेक्स, सुधिंग्र नगर

वॉर्ड आरक्षित झालाय का?

हो. वॉर्ड क्रमांक दोन महिलांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. सर्वसाधारण महिला गटासाठी वॉर्ड क्रमांक दोन आरक्षित करण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

2017 मधील चित्र नेमकं काय होतं?

  1. भाजप जगदीश ओधा 10719
  2. शिवसेना भालचंद्र म्हात्रे 7924
  3. काँग्रेस जगमोहन भंवर 1768
  4. मनसे शैलेश उतेकर 814
  5. राष्ट्रवादी काँग्रेस गिरीश सावंत 92
  6. अपक्ष दत्ताराम नाईक 164

विजयी उमेदवार – भाजप जगदीश ओझा

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनाभालचंद्र म्हात्रे7924
भाजपजगदीश ओधा10719
राष्ट्रवादी काँग्रेसगिरीश सावंत92
काँग्रेसजगमोहन भंवर1768
मनसेशैलेश उतेकर814
अपक्ष / इतरदत्ताराम नाईक164

वॉर्ड क्रमांक 2मध्ये असलेल्या सर्व नगरसेवकांची गोची झाली. कारण हा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित केला गेला. त्यामुळे आता या वॉर्डमधून आपआपल्या बायकांना नगरसेवक उमेदवारी देताना दिसले, तर आश्चर्य वाटायला नको. 2017 साली या निवडणुकीत थेट सामना हा भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये झाला. भाजपच्या उमेदवारानं शिवसेनेला धूळ चारली होती. जवळपास तीन हजार मतांच्या फरकानं भाजप उमेदवार जगदीश ओधा हे विजयी झाले होते.

मतदार आणि मतांची आकडेवारी

  1. एकूण मतदार आहेत? 35385
  2. 2017 साली एकूण वैध मतं किती होती? 22163
  3. नोटाला किती जणांनी मत दिलं होतं? 349

वॉर्डची लोकसंख्या किती?

  1. एकूण लोकसंख्या 52007
  2. अनुसूचित जाती 1908
  3. अनुसूचित जमाती 482

आरक्षण सोडतीमध्ये मुंबई महानगर पालिका वॉर्ड क्रमांक दोन हा महिलांसाठी आरक्षित करण्यात आलाय. या मुळे आता या वॉर्डाकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे. 2022 साठी सध्या या वॉर्डातले विद्यमान नगरसेवक नेमकी काय राजकीय भूमिका घेतात, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.