BMC Election 2022 BMC Colony Ward No 34 : बीएमसी कॉलनीत कोणता नगरसेवक निवडून येणार?

BMC Election 2022 Ward No 34 : मालाडच्या भागात मोडणारा वॉर्ड क्रमांक 34 मध्ये कोण कुणावर मात करणं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

BMC Election 2022 BMC Colony Ward No 34 : बीएमसी कॉलनीत कोणता नगरसेवक निवडून येणार?
कोण मारणार बाजी?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 3:30 AM

BMC Election 2022 Ward No 34 मुंबई : मुंबईतील वॉर्ड क्रमांक 34 मधील नगरसेवकांसमोर आव्हानं उभी ठाकली आहेत. कारण वॉर्ड क्रमांक 34 आरक्षित करण्यात आलाय. त्यामुळे आता वॉर्ड क्रमांक 34 मधील राजकीय स्थिती नेमकी काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. काँग्रेसने या वॉर्डमध्ये आपली सत्ता राखली होती. पण आता हा वॉर्ड आरक्षित झाल्यामुळे काँग्रेसला पुन्हा विजय मिळवणं, शक्य असेल की नाही, हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहेत. बीएमसी कॉलनी आणि मालवणी परिसरातील हा वॉर्ड काँग्रेसचा किल्ला मानला जातो. पण या किल्ल्याला महाविकास आघाडी सरकार मिळून संरक्षण देणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचंय. भाजपला मात देण्यासाठी महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महापालिकेच्या निवडणुकीला तोंड देतात का? 2022 च्या पालिका निवडणुकीसाठी नेमकी राजकीय रणनिती काय ठरते? यावर अनेकांचं भवितव्य ठरणार आहे. चला चर जाणून घेऊयात वॉर्ड क्रमांक 34 ची रचना…

वॉर्ड नंबर 34 मध्ये नेमका कोणकोणता भाग मोडतो?

बीएमसी कॉलनी, ओल्ड कलेक्टर कम्पाऊंड, मालवणी पोलीस स्टेशन

वॉर्ड आरक्षित झालाय का?

मुंबईतील वॉर्ड क्रमांच 34 सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आला. 2017 साली या वॉर्डमधून निवडून आलेल्या विद्यमान नगरसेवकांसमोर आता मोठं आव्हान असणार आहे. 2017 साली काँग्रेस उमेदवारानं मोठ्या मताधिक्यानं शिवसेना आणि भाजप उमेदवारांना पराभूत केलं होतं. 2022मध्ये शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये आगामी पालिका निवडणुकीत थेट लढत होण्याची शक्यताय. मात्र वॉर्ड क्रमांक 34चा 2017 सालचा निकाल काँग्रेसच्या बाजूने लागलेला. काँग्रेस उमेदवारानं 2017 मध्ये निर्विवाद विजय मिळवला होता.

हे सुद्धा वाचा
पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनासुवर्णा प्रकााश माद्याळकर4195
भाजपआजम शबाना जावेद4027
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेसकमरजहाँ सिद्दीकी10500
मनसेघाडीगावकर वैशाली विश्वास1127
अपक्ष / इतरआलिया हैयूर खान 1490

2017 मधील चित्र नेमकं काय होतं?

  1. काँग्रेस कमरजहाँ सिद्दीकी 10500
  2. शिवसेना सुवर्णा प्रकााश माद्याळकर 4195
  3. भाजप आजम शबाना जावेद 4027
  4. बहुजन मुक्ती पार्टी बोंडारे विमान लक्ष्मण 56
  5. मनसे घाटीगावकर वैशाली विश्वास 1127
  6. ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन आलिया हैयूर खान 1490
  7. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) खान नसीम बेगम अहमद 294
  8. सपा सोनी सोहेल रिझवी 934
  9. अपक्ष रुपाली बिनय सिंग 70

विजयी उमेदवार – कमरजहाँ सिद्दीकी

मतदार आणि मतांची आकडेवारी

  1. एकूण मतदार 41896
  2. एकूण वैध मतं 22693
  3. नोटा 224

वॉर्डची लोकसंख्या किती?

  1. एकूण लोकसंख्या 48376
  2. अनुसूचित जाती 1657
  3. अनुसूचित जमाती 1228

मालाडच्या भागात मोडणारा वॉर्ड क्रमांक 34 मध्ये कोण कुणावर मात करणं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर महापालिकेनं आरक्षण सोडत जाहीर केलं. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 34 आरक्षित झाला. महिलांच्या ओपन कॅटेगिरीसाठी आरक्षित झालेल्या या वॉर्डमध्ये रंगतदार लढत होण्याची शक्यताय.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.