BMC Election 2022 : अपक्ष ठरवतात वार्डातील (107) राजकीय समीकरणे, भाजपचे वर्चस्व असलेल्या वार्डात यंदा काय?

वार्ड क्र. 107 मध्ये भाजप आणि शिवसेना वगळता इतर प्रमुख पक्षातील उमेदवाराला मतदारांनी स्पष्ट नाकारलेले आहे. याउलट अपक्षाला साथ दिल्याचे गत निवजणुकीतील आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. अपक्ष असलेल्या वैशाली शाह यांना 4 हजार 705 तर मनसेच्या हर्षला चव्हाण यांना 2327, क़ॉंग्रेसच्या माधुरी मिरेकर यांना 3785 असे मतदान आहे.

BMC Election 2022 : अपक्ष ठरवतात वार्डातील (107) राजकीय समीकरणे, भाजपचे वर्चस्व असलेल्या वार्डात यंदा काय?
मुंबई महापालिकेच्या वार्ड क्र. 107 मध्ये भाजपाचे वर्चस्व कायम राहणार का?
राजेंद्र खराडे

|

Jun 07, 2022 | 8:28 AM

मुंबई :  (Mumbai BMC) मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे वारे आता अधिक जोमात वाहू लागले आहे. आता राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या की प्रत्येक पक्षाच्या अजेंड्यावर (Mumbai Municipal Corporation) मुंबई महानगरपालिका हाच विषय असणार आहे. महापालिकेच्या वार्ड क्रमांक 107 मध्ये प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाचे वर्चस्व असून या वार्डाचे नेतृत्व हे समिता कांबळे ह्या करीत आहे. या वार्डात नेतृत्व प्रमुख पक्षातील उमेदरावाराचे असले तरी यामध्ये अपक्षांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. दुसऱ्या नंबरवर असलेल्या उमेदवाराला अपक्षामुळे कायम (Division of votes) मत विभाजनाचा धोका राहिला आहे. शिवाय गत निवडणुकीत या वार्डात 3 अपक्षांनी आपले नशिब आजमावले होते तर अपक्ष असलेल्या वैशाली विरह शाह यांना तब्बल 4 हजार 705 मते मिळाली होती. यामुळेच दोन नंबरवर राहिलेल्या शिवसेनेच्या मालती जगदिश शेट्टी यांचा प्रवास खडतर झाला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोणता पर्याय काढला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रमुख पक्षापेक्षा अपक्षाचा बोलबाला

वार्ड क्र. 107 मध्ये भाजप आणि शिवसेना वगळता इतर प्रमुख पक्षातील उमेदवाराला मतदारांनी स्पष्ट नाकारलेले आहे. याउलट अपक्षाला साथ दिल्याचे गत निवजणुकीतील आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. अपक्ष असलेल्या वैशाली शाह यांना 4 हजार 705 तर मनसेच्या हर्षला चव्हाण यांना 2327, क़ॉंग्रेसच्या माधुरी मिरेकर यांना 3785 असे मतदान आहे. त्यामुळे दोन नंबर असलेल्या उमेदवाराच्या मतावर अपक्षाचा कायम प्रभाव राहिलेला आहे.शिवाय गत निवडणुकीत 3 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. यंदाही अपक्ष उमेदवारावर नजरा राहणार आहेत.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

10 उमेदवारांनी आजमावले होते नशीब

येथील प्रभाग क्र. 107 मध्ये गतवर्षी 28,921 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर उमेदारांमध्ये भाजपा, कॉंग्रेस, शिवसेनासह आरपीआय आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदरवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी तीन अपक्षांचाही यामध्ये सहभाग होता. सध्या वार्ड क्रमांक 107 चे नेतृत्व भाजपाच्या समिता कांबळे ह्या करीत असल्या तरी गेल्या पाच वर्षातील बदलत्या राजकीय समीकरणाचा परिणाम यंदाच्या निवडणुकीत दिसणार आहे.

अशी आहे मतांची गोळाबेरीज

<< हर्षला राजेश चव्हाण(मनसे)- 2327

<< धिवर कल्पना किशोर (बहुजन समाज पार्टी)- 218

<< कांबळे समिता विनोद (भाजपा)- 10,505

<< माधुरी सतीश मिरेकर (कॉंग्रेस)- 3785

<< पाष्टे रेणुका कैलास (अपक्ष)- 87

<< संजना अशोक साळवे (अपक्ष)-83

<< वैशाली विरह शाह (अपक्ष)-4705

<< मालती जगदीश शेट्टी (शिवसेना)- 5518

<< गीताबेन जे सोलंकी (आरपीआय)- 80

<< रुपाली पंकज सुभेदार (राष्ट्रवादी कॉंग्रेस)- 984

<< नोटा – 629

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें