BMC Election 2022 Vinoba Bhave Nagar ward 167: विनोबा भावे नगर परिसरात काँग्रेसचं मताधिक्य, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार?

राज्यातील 14 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मुंबई महानगरपालिकेतील वॉर्डांसाठीही आरक्षण सोडत घोषित झाली आहे. यानुसार, वॉर्ड क्रमांक 167 हा खुल्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आला आहे.

BMC Election 2022 Vinoba Bhave Nagar ward 167: विनोबा भावे नगर परिसरात काँग्रेसचं मताधिक्य, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 5:00 PM

मुंबईः राज्यभरातील 14 महापालिकांच्या निवडणुकांचा  (Municipal Corporation Election)बिगुल वाजला असून सर्वच पक्ष वेगानं कामाला लागले आहेत. मुंबई महापालिका (BMC Election) तर अवघ्या राज्याच्या राजकारणाचं केंद्रस्थान. त्यामुळे येथील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून अवघं राजकीय वर्तुळ ढवळून निघत आहेत. महापालिकेतील भाजप आणि शिवसेना हे दोन मातब्बर पक्ष आमने सामने असून दोघांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी होत आहेत. अर्थातच महापालिका निवडणुकीवर या सर्वांचे पडसाद पहायला मिळणार आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत 2017 मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. यापैकी वॉर्ड क्रमांक 167 मध्ये म्हणजेच विनोबा भावे नगर परिसरात काँग्रेसच्या (NCP Candidate) उमेदवारानं बाजी मारली होती. काँग्रेसच्या दिलशादबानू मोहम्मद अश्रफ आझमी यांनी इतर उमेदवारांना धूळ चारत मोठी आघाडी मिळवली होती. यंदादेखील काँग्रेसचा पंजा नशीब आजमावणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

2017 मध्ये विजयी कोण?

मुंबई महापालिका निवडणुकीत 2017 मध्ये वॉर्ड क्रमांक 167 मधून दिलशादबानू मोहम्मद अश्रफ आझमी या काँग्रेसच्या नगरसेविकेनं मोठा विजय मिळवला. समाजवादी पार्टीच्या उमेदवारापेक्षा दुपटीनं मताधिक्य मिळवत या उमेदवारानं नगरसेवक पदाची खुर्ची काबीज केली होती. यंदाही काँग्रेसचा उमेदवार ही किमया दाखवणार का की इतर पक्षांचे प्रयत्न यशस्वी होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

मागील निवडणुकीचं मतांचं गणित कसं?

आजमी दिलशादबानू मोहम्मद अश्रफ- इंडियन नॅशनल काँग्रेस- 8874 शेख रुकसाना मोहम्मद इ्स्माइल- समाजवादी पार्टी- 4777 गांगुर्डे सुरेखा जितेश- रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया- 1526 खैरनार लता राजन- शिवसेना- 3583 अन्सारी नासीम बानो इम्रान- मनसे- 726 शेख रुकया अब्दुल असद- एमआयएम- 678 गांगुर्डे सुशीला सुनिल- आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया- 232 शेख फरहा नाज मोहम्मद साबीर- अपक्ष-72 शेख शकुनात निशा झियाउल्लाह- अपक्ष- 28 वैध मते – 20798

वॉर्डातील महत्वाचे भाग कोणते?

विनोबा भावे नगर, बुद्ध कॉलनी, ब्राह्मणवाडी, देवनार फायर स्टेशन, कुर्ला स्टेशन (पश्चिम)

लोकसंख्येचा टक्का कसा?

वॉर्ड क्रमांक 167 मधील लोकसंख्येचं गणित पाहता 2011 मधील जनगणनेनुसार, येथे 54,989 एवढी लोकसंख्या होती. यापैकी अनुसूचित जाती 2 हजार 159 एवढी तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या 323 एवढी होती.

वॉर्ड आरक्षित की खुला?

राज्यातील 14 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मुंबई महानगरपालिकेतील वॉर्डांसाठीही आरक्षण सोडत घोषित झाली आहे. यानुसार, वॉर्ड क्रमांक 167 हा खुल्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आला आहे.

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस आजमी दिलशादबानू मोहम्मद अश्रफविजयी उमेदवार
समाजवादी पार्टीशेख रुकसाना मोहम्मद इस्माइल-
रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियागांगुर्डे सुरेखा जितेश-
शिवसेनालता खैरनार-
मनसेअन्सारी नासीम बानो-
अपक्ष / इतर--
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.