Mumbai Municipal Election | यह तो झांकी है….मुंबई महापालिका अभी बाकी है…! भाजपने शिवसेनेला डिवचले

मुंबई महापालिकेमध्ये सध्या शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, यंदाच्या निवडणूकीमध्ये आमचीच सत्ता मुंबई महापालिकेवर येणार असल्याचा दावा यापूर्वी अनेकदा भाजपाकडून करण्यात आलायं. आता तर राज्यात भाजपाची सत्ता येणार म्हटल्यावर मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप अजून जास्त ताकदीने लढणार हे नक्की आहे.

Mumbai Municipal Election | यह तो झांकी है....मुंबई महापालिका अभी बाकी है...! भाजपने शिवसेनेला डिवचले
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 12:44 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बंडखोरी आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा राजीनामा यादरम्यान राज्याच्या राजकारणाला प्रचंड वेग आला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Resigned) दिल्यानंतर ठाकरे सरकार कोसळलं आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजपा सत्तास्थापन करणार असल्याचे स्पष्ट आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देताच देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले. यामुळे राज्यात परत एकदा भाजपाचे (BJP) सरकार येणार असल्याचे संकेत आहेत.

इथे पाहा मुंबई भाजपाचे ट्विट

मुंबई भाजपच्या ट्विटची जोरदार चर्चा

याचदरम्यान मुंबई भाजपाचे एक ट्विट व्हायरल होताना दिसते आहे, या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे आणि फडणवीस यांच्या हातामध्ये बॅट आहे. हे ट्विट शेअर करताना लिहिले आहे की, यह तो झांकी है….मुंबई महापालिका अभी बाकी है…! विशेष म्हणजे हे ट्विट देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना टॅन करण्यात आलयं. आताच राज्यातील सत्तासंघर्ष कमी झालेल्या असताना मुंबई भाजपाकडून अशाप्रकारचे ट्विट करून शिवसेनेला डिवचण्याचाच प्रयत्न केला आहे.

शिवसेनेला डिवचण्याचाच प्रयत्न

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर ठाण्यासह राज्यातील अनेक महापालिकांवर शिवसेनेची सत्ता धोक्यात आलीयं. तसेच 16 महापालिकांच्या निवडणूका देखील तोंडावर असल्याने शिवसेनेला हा मोठा धक्काच समजला जातो. मुंबई महापालिकेमध्ये सध्या शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, यंदाच्या निवडणूकीमध्ये आमचीच सत्ता मुंबई महापालिकेवर येणार असल्याचा दावा यापूर्वी अनेकदा भाजपाकडून करण्यात आलायं. आता तर राज्यात भाजपाची सत्ता येणार म्हटल्यावर मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप अजून जास्त ताकदीने लढणार हे नक्की आहे.

Non Stop LIVE Update
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.