NMC Election 2022: प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपाचे वर्चस्व, बदलत्या राजकीय स्थितीचा यंदाच्या निवडणुकीवर होणार का परिणाम?

नागपूरची लोकसंख्या ही 24 लाख 47 हजार 494 एवढी आहे. तर यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 48 हजार 0759 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1 लाख 88 हजार 444 एवढी आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. प्रभाग क्रमांक 13 ची लोकसंख्या ही 44 हजार 748 एवढी असून यापैकी अनुसूचित जातीची 16 हजार 308 तर अनुसूचित जमातीची 3 हजार 861 एवढी लोकसंख्या आहे.

NMC Election 2022: प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपाचे वर्चस्व, बदलत्या राजकीय स्थितीचा यंदाच्या निवडणुकीवर होणार का परिणाम?
नागपूर महापालिका
राजेंद्र खराडे

|

Aug 06, 2022 | 6:35 PM

नागपूर : गेल्या महिन्याभरात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे राजकारण हे ढवळून निघाले आहे. (Municipal Elections) महापालिका निवडणुकीला आवकाश असला तरी (Reservation announced) आरक्षण जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवरीलही राजकारण हे ढवळून निघत आहे. 2017 च्या महापालिका निवडणूकीत (Nagpur Municipal) नागपूरच्या महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला होता. शिवाय प्रभाग क्रमांक 13 मधील चारही वार्डात भाजपाचेच नगरसेवक निवडुण आले होते. यंदा होऊ घातेलेल्या निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. नव्याने अस्तित्वात आलेल्या शिंदे गटातील नेत्यांनी भाजपावर विश्वास दाखवल्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपाची ताकद वाढणार यामध्ये शंका नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने एकत्र निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला तर काय होणार? यावरच महापालिका निवडणुकांची समिकरणे राहणार आहेत. 2017 च्या महापालिका निवडणुकीत 151 वार्डांपैकी 108 जागांवर भाजपाला यश मिळाले होते. त्यामुळे महापालिकेबरोबर येथील प्रभाग क्रमांक 13 मधील चारही वार्डात कमळच फुलले होते. यंदा एका प्रभागात 3 वार्ड राहणार आहेत. त्यामुळे बदलत्या राजकीय स्थितीचा परिणाम थेट वार्डावर होणार का हे देखील पहावे लागणार आहे.

प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपाचे वर्चस्व

प्रभाग क्रमांक 13 मध्ये गत निवडणुकीत 4 वार्ड होते तर चारही वार्डात भाजपाला विजय खेचून आणण्यामध्ये यश आले होते. यामध्ये भाजपाचे अमर बडगे यांना 11 हजार 247 मते, वार्ड क्रमांक दोनमध्ये रुतिका मेश्राम यांना 12 हजार 843 एवढी मते, तीनमध्ये परिणिता फुके यांना 12 हजार 961 एवढी मते तर वार्ड क्र. 4 मध्ये वर्षा ठाकरे यांना 12 हजार 310 एवढी मते मिळाली होती. त्यामुळे संपूर्ण प्रभागात कमळच फुलले होते.

असे आहे महापालिकेचे स्वरुप

नागपूर महापालिकेत एकूण 156 जागा आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी 31, अनुसूचित जमातीसाठी 12, महिलांसाठी 56 जागा राखीव आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत 52 प्रभाग आणि प्रत्येक प्रभागात 3 वार्ड असे स्वरुप राहणार आहे.

लोकसंख्येचे गणित हे असे

नागपूरची लोकसंख्या ही 24 लाख 47 हजार 494 एवढी आहे. तर यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 48 हजार 0759 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1 लाख 88 हजार 444 एवढी आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. प्रभाग क्रमांक 13 ची लोकसंख्या ही 44 हजार 748 एवढी असून यापैकी अनुसूचित जातीची 16 हजार 308 तर अनुसूचित जमातीची 3 हजार 861 एवढी लोकसंख्या आहे. उर्वरित मतदार हे सर्वसाधारणचे असून या मतदारांवरच प्रभागाच्या निवडणुकांचे गणित अवलंबून आहे.

प्रभाग क्रमांक 13 मधील महत्वाचा भाग

2017 साली झालेल्या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये चार वार्ड होते. तर या प्रभागात मोतीबाग, लष्करीबाग, गुरुनानक पुरा, अशोकनगर, बालाभाऊ पेठ, नवा नकाशा, मोतीबाग रेल्वे कॉलनी, आवळे नगर, कमाल चौक, पाचपावली पोलीस स्टेशनच्या परिसराचा सहभाग होता. पण आता 2022 मध्ये वार्ड फेररचना झाली असून यामधील काही वार्ड हे दुसऱ्या मतदारसंघात जाण्याची शक्यता नाकरता येत नाही.

यंदाच्या निवडणुकीत आरक्षणाचे असे चित्र

यंदा होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आरक्षण तर जाहीर झाले आहे मात्र, राज्य निवडणुक आयोगाने निवडणुकाकडून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये ‘अ’ मध्ये अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव जागा आहे. ‘ब’ मध्ये अनुसूचित जमातीसाठी तर ‘क’ मध्ये सर्वसाधरण असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यंदा प्रभागामध्ये तीनच वार्ड राहणार आहेत.

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 13 अ

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
बसपा
इतर

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 13 ब

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
बसपा
इतर

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 13 क

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
बसपा
इतर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें