NMC Election 2022: प्रभाग क्रमांक 14 मध्ये कुणाला मिळणार संधी? कॉंग्रेसची एक जागाही भाजप काबीज करणार का?

प्रभाग क्रमांक 14 मध्ये गत निवडणुकीत 4 वार्ड होते. यामधील तीन वार्डामध्ये भाजपाचे नगरसेवक तर केवळ एका जागेवर कॉंग्रेसला यश मिळाले होते. प्रभागातील वार्ड क्रमांक एकमध्ये भाजपाच्या शिल्पा धोटे यांना 11 हजार 583, दोनमध्ये प्रमोद कौरती यांना 11 हजार 588 , तीनमध्ये कॉंग्रेसचे कमलेश चौधरी यांना 12 हजार 375 हे विजयी झाले होते तर चारमध्ये पुन्हा भाजपाच्या प्रगती पाटील यांना 10 हजार 1 एवढी मते मिळाली होती.

NMC Election 2022: प्रभाग क्रमांक 14 मध्ये कुणाला मिळणार संधी? कॉंग्रेसची एक जागाही भाजप काबीज करणार का?
नागपूर महापालिका
राजेंद्र खराडे

|

Aug 06, 2022 | 6:25 PM

नागपूर : 2017 च्या (Nagpur Municipal) नागपूर महापालिका निवडणुकीत (BJP) भाजपाने तब्बल 108 जागांवर कमळ फुलवून वर्चस्व मिळवले होते. नागपूर हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जात आहे. यातच राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे भाजपाला हत्तीचे बळ मिळाले आहे. त्याचा परिणाम आता स्थानिक निवडणुकांवरही पाहवयास मिळणार यात शंका नाही. भाजप पाठोपाठ (Congress) कॉंग्रेसचे नगरसेवक हे निवडुण आले होते. मात्र, गत तीन वर्षामध्ये राज्याच्या राजकारणात दोन वेळा सत्तेमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थानिक पातळीवर पक्ष संघटनावर भर देण्यात आला होता तर आता राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. शिवाय शिंदे गटाची ताकदही भाजपाला मिळणार असल्याने चित्र कायम राहणार का हे पहावे लागणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकात नागपूरचा क्रमांक आहे. यंदा तो तीन वॉर्डांचा करण्यात आला आहे. या प्रभागावरही भाजपची सत्ता होती. आगामी निवडणुकीत या प्रभागावर भाजपचे वर्चस्व राहणार का हे पहावे लागणार आहे. प्रभाग क्रमांक 14 हा मागील वर्षी चार वॉर्डांचा होता. यंदा तो तीन वॉर्डांचा करण्यात आला आहे. यामधील तीन वार्डामध्ये भाजपाचे नगरसेवक होते तर केवळ एका जागेवर कॉंग्रेसला समाधान मानावे लागले होते.

प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपाचे वर्चस्व

प्रभाग क्रमांक 14 मध्ये गत निवडणुकीत 4 वार्ड होते. यामधील तीन वार्डामध्ये भाजपाचे नगरसेवक तर केवळ एका जागेवर कॉंग्रेसला यश मिळाले होते. प्रभागातील वार्ड क्रमांक एकमध्ये भाजपाच्या शिल्पा धोटे यांना 11 हजार 583, दोनमध्ये प्रमोद कौरती यांना 11 हजार 588 , तीनमध्ये कॉंग्रेसचे कमलेश चौधरी यांना 12 हजार 375 हे विजयी झाले होते तर चारमध्ये पुन्हा भाजपाच्या प्रगती पाटील यांना 10 हजार 1 एवढी मते मिळाली होती. यंदा मात्र, एका प्रभागात तीनच वार्ड राहणार आहेत.

असे आहे महापालिकेचे स्वरुप

नागपूर महापालिकेत एकूण 156 जागा आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी 31, अनुसूचित जमातीसाठी 12, महिलांसाठी 56 जागा राखीव आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत 52 प्रभाग आणि प्रत्येक प्रभागात 3 वार्ड असे स्वरुप राहणार आहे.

लोकसंख्येचे असे आहे स्वरुप

नागपूरची लोकसंख्या ही 24 लाख 47 हजार 494 एवढी आहे. तर यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 48 हजार 0759 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1 लाख 88 हजार 444 एवढी आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये एकूण लोकसंख्या ही 41 हजार 962 एवढी आहे तर यापैकी अनुसूचित जाती 28 हजार 194 तर अनुसूचित जमाती 982 एवढी आहे. त्यामुळे या प्रभागाचे गणित देखील उर्वरित सर्वसाधारण मतदारांवरच अवलंबून आहे. त्याच अनुशंगाने उमेदवार ठरविला जाणार आहे.

प्रभाग क्रमांक 14 मधील महत्वाचा भाग

प्रभाग क्रमांक 14 ची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये 41 हजार 962 एवढी लोकसंख्या आहे. तर 2017 च्या निवडणुकीत इंदोरा, न्यु इंदोरा, बेझनबाग, क्लार्क टाऊन, मेकोसाबाग, ख्रिश्चन कॉलनी, चॉक्स कॉलनी, बाराखोली, लघुवेतन कॉलनी, रिपब्लिकन नगर, मायानगर या परिसराचा समावेश आहे. शिवाय प्रभागाच्या चौहीबाजूचा देखील यामध्ये समावेश होता. पण आता 2022 मध्ये वार्ड फेररचना झाली असून यामधील काही वार्ड हे दुसऱ्या मतदारसंघात जाण्याची शक्यता नाकरता येत नाही.

यंदाच्या निवडणुकीत आरक्षणाचे असे चित्र

यंदा होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आरक्षण तर जाहीर झाले आहे मात्र, राज्य निवडणुक आयोगाने निवडणुकाकडून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.त्यामुळे इच्छूक हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीत असले तरी त्यांना काही काळ ही वाट पहावी लागणार आहे. यंदा होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी प्रभागात केवळ तीनच वार्ड राहणार आहेत. यामध्ये ‘अ’ हा अनुसूचित जातीमधील महिलेसाठी तर ‘ब’ सर्वसाधारण महिलेसाठी तर ‘क’ वार्ड हा सर्वसाधारणसाठी असणार आहे. त्यानुसार पक्षाकडून उमेदवार ठरवला जाणार आहे.

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 14 अ

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
बसपा
इतर

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 14 ब

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
बसपा
इतर

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 14 क

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
बसपा
इतर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें