Narendra Mehta : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा दाखल, बेकायदेशीर संपत्तीप्रकरणी एसीबीची मोठी कारवाई

लोकप्रतिनिधी असताना नरेंद्र मेहतांवर 8 कोटी 25 लाख 51 हजार एवढ्या रकमेची धनसंपदा बेकायदेशीररीत्याने गोळा केल्याचा आरोप होता. तर त्यांच्यावर महिलांचे शोषण केल्याचेही आरोप याआधी लागले होते.

Narendra Mehta : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा दाखल, बेकायदेशीर संपत्तीप्रकरणी एसीबीची मोठी कारवाई
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा दाखल, बेकायदेशीर संपत्तीप्रकरणी एसीबीची मोठी कारवाईImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 9:11 PM

ठाणे : भाजपा माजी आमादार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) आणि त्यांची पत्नीवर ठाणे एसीबी मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या घरी आणि कार्यालयावर एसीबी (ACB) ठाणेची कारवाई सध्या सुरू आहे. लोकप्रतिनिधी असताना नरेंद्र मेहतांवर 8 कोटी 25 लाख 51 हजार एवढ्या रकमेची धनसंपदा बेकायदेशीररीत्याने गोळा (Illegal Assets) केल्याचा आरोप होता. तर त्यांच्यावर महिलांचे शोषण केल्याचेही आरोप याआधी लागले होते. नगरसेवक असताना आपल्या पदाचा दुरोपयोग करुन कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याचा आरोप मेहता यांच्यावर ठेवण्यात आलाय. तसेच मेहता यांच्या पत्नीवरही यात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आाला आहे. त्यामुळे या कारवाईन पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. राज्यात आधीच अनेक प्रकरण गाजत असताा हे नवं प्रकरण आता चर्चेत आलंय.

दिवसभराच्या चौकशीनंतर कारवाई

नरेंद्र मेहता हे जानवेरी 2006 ते 2015 या काळात मोठ्या पदावर होते. या कालावधीतच त्यांनी बेकायदेशीर संपत्ती जमवल्याचा आरोप केला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत दिवसभर मेहता यांची कार्यालयात आणि त्यांच्या घरी चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर एसीबीने हा गुन्हा दाखल केला आहे. यात एसीबीने खुल्या चौकशीचे आदेश काढले होते. एसीबीकडून त्यांच्या घराची आणि कार्यालयाचीही झाडाझडली घेण्यात आली. यात विविध कागदपत्रेही तपासण्यात आली आहेत. आता भाजपच्याच एका नेत्यावर अशा प्रकारची कारवाई झाल्याने वेगवेगळ्या राजकी चर्चांणा उधाण आले आहे.

फडणवीसांसोबत स्टेजवरही दिसले

2019 मध्ये मेहता यांचा अपक्ष आमदार गीता जैन यांच्याकडून पराभव झाला होता. फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांचे काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडल्याचा दावा केला होता. सोमवारी आगामी निवडणुकांपूर्वी काही प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी मीरा-भाईंदरमध्ये असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्यासपीठावरही दिसले होते. त्यामुळे मेहता नेमके भाजपात आहेत की नाही, याबाबतही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा

निवडणुकीत फटका बसणार?

नवघर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत मेहता यांच्यावर जानेवारी 2006 ते 31 ऑगस्ट 2015 या कालावधीत बेहिशोबी मालमत्ता जमवण्यासाठी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर कलम 13 (1)(ई) आणि 13 (इ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर आता ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आणखी एका नेत्याच्या अडचणीत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली वाढ झाली आहे. तसेच आगामी काही दिवसांतच मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा त्या निवडणुकीतही फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.