…तेव्हा पोपट घेऊन चंद्रकांत पाटील चिठ्ठ्या काढत होते; नवाब मलिक यांचं टीकास्र

तर चकवेगिरी करण्यासाठी रावसाहेब दानवे समोर आले, असं म्हणत नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. (Nawab Malik Criticism Of Chandrakant Patil On Government Will Fall)

  • दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद
  • Published On - 10:12 AM, 29 Nov 2020

औरंगाबादः सरकार पडणार असं सांगणारी ज्योतिष विद्या खरी नाही हे सिद्ध झाले आहे. पोपट घेऊन चंद्रकांत पाटील चिठ्ठ्या काढत होते, त्या चिठ्ठ्यांची भविष्यवाणी खरी झाली नाही, तर चकवेगिरी करण्यासाठी रावसाहेब दानवे समोर आले आहेत, असं म्हणत अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. (Nawab Malik Criticism Of Chandrakant Patil On Government Will Fall)

औरंगाबादेत सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी आले असता ते बोलत होते. भाजपचेच अनेक मोठे नेते हे मोठ्या संख्येने काँग्रेस आणि राष्ट्रवादीत घरवापसी करणार आहेत, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून गेलेले आमदार भाजप सोडण्याच्या मनस्थितीत आहेत, त्यांना टिकवून ठेवण्यासाठीच सरकार पडेल असं भाजप बोलत आहे, असं सांगतानाच महाविकास आघाडी सरकार 5 वर्षं पूर्ण करेल, असा विश्वासही नवाब मलिक यांनी बोलून दाखवला. Nawab Malik Criticism Of Chandrakant Patil On Government Will Fall Issue

तर “ठाकरे सरकार हे पूर्णपणे अपयशी, गोंधळलेलं आणि दिशा नसलेलं सरकार आहे. वर्षभर तुम्ही कसं काम करता, ते जनतेने पाहिलं. आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या” अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त चंद्रकांतदादांनी टीकास्त्र सोडलं होतं.

“मराठा आरक्षण, कृषी अशा सर्वच स्तरावर सरकारला अपयश आलं आहे. सरकारमध्ये एकजिनसीपणा नाही. प्रत्येक जण आपापलं डिपार्टमेंट सांभाळतो. मुख्यमंत्र्यांकडे व्हिजन असावे लागते. त्यांना सर्वांना खेचून न्यायचं असतं. मात्र ही उद्धव ठाकरेंची तयारी नाही. सरकार चालवणं हे त्यांचं काम नाही. वर्षभर तुम्ही कसं काम करता ते जनतेने पाहिलं आहे, आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या” असं आवाहन चंद्रकांतदादांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना केलं होतं. त्यालाच आता अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिकांनी उत्तर दिलं आहे.

“मुख्यमंत्र्यांनी सहनशीलता वाढवली पाहिजे”

“मुख्यमंत्र्यांची गरिमा राखणारी ही भाषा नाही, सामनाच्या मुलाखतीतून फक्त धमक्या दिल्या. मुख्यमंत्र्यांची भाषा ही संयमी असावी. मुख्यमंत्री आश्वासक वाटावा, भीतिदायक नाही. त्यांनी सहनशीलता वाढवली पाहिजे,” असा सल्लाही त्यांनी दिला होता.

“फक्त कंगना रनौत प्रकरणच नाही, तर गेल्या वर्षभरात 13 निर्णयात न्यायालयाने ठाकरे सरकारला ठोकलं होतं. यांचा कोण सल्लागार आहे, हेच समजत नाही, अर्णव गोस्वामी, कंगना रनौत प्रकरणात यांनी अमर्याद सत्ता वापरली. इंदिरा गांधींनीही तेच केलं होतं. देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या शपथविधीनंतर सुप्रीम कोर्टाने तुमच्या बाजूने निर्णय दिला, तर कोर्ट चांगलं. अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायलाच लागेल, असं कोर्टाने सांगितलं की कोर्ट मॅनेज. कंगनाच्या बाबतही कोर्टाने जोरदार चपराक लगावली आहे, त्यामुळे हायकोर्ट मॅनेज आहे, असंच म्हणतील,” अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

(Nawab Malik Criticism Of Chandrakant Patil On Government Will Fall)

संबंधित बातम्या

‘चंद्रकांत पाटील नावाची गोळी विरोधकांना दिवसातून 5 वेळा घेतल्याशिवाय झोपच लागत नाही’