अजित पवार शिवतीर्थावर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?

उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचं नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत (Ajit pawar will be deputy cm) आहे.

अजित पवार शिवतीर्थावर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अवघ्या चार दिवसात कोसळल्यानंतर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार निश्चित झालं (Ajit pawar will be deputy cm) आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे उद्या (28 नोव्हेंबर) शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह उद्या (28 नोव्हेंबर) काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री थपथ घेणार (Ajit pawar will be deputy cm) आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचं नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत (Ajit pawar will be deputy cm) आहे.

महाविकासाआघाडीकडून शिवसेनेला मुख्यमंत्रिपद तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदं मिळणार आहे.  महाविकासआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असल्याचे निश्चित झालं आहे. तर उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडून कालपर्यंत जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अजित पवार यांच्या घरवापसीनंतर त्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात (Ajit pawar will be deputy cm) रंगली आहे. यामुळे राष्ट्रवादीकडून नेमकं कोण उपमुख्यमंत्री होणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

याच पार्श्वभूमीवर सध्या यशवंतराव चव्हाण सेंटरवर महाविकासआघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरेंसह उद्या कोण कोण मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित होणार आहे. या बैठकीला शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते सहभागी झाले आहेत. त्यामुळे कोणच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे लवकरच निश्चित होणार असल्याचे बोललं जात आहे.

अजित पवारांचे पुनरागमन

अजित पवार यांनी बंडखोरी करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे गेले काही दिवस पवार कुटुंबात तणाव होता. मात्र अजित पवार यांनी राजीनामा देत घरवापसी केली. अजित पवार काल शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकमध्ये गेले होते. यावेळी छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

अजित पवारांच्या पुनरागमनासोबतच पवार कुटुंबातील ताणही विरल्याचं चित्र आहे. ‘दादाचंच घर आहे, त्याला वेलकम करण्याचा प्रश्नच येत नाही’ अशी प्रतिक्रियाही सुळेंनी दिली होती.

मंत्रिमंडळाचं संभाव्य वाटप

शिवसेना –

11 कॅबिनेट + 4 राज्यमंत्री + 1 मुख्यमंत्री – एकूण 16

राष्ट्रवादी –

11 कॅबिनेट (उपमुख्यमंत्रिपदासह) + 4 राज्यमंत्री – एकूण 15

काँग्रेस –

9 कॅबिनेट (उपमुख्यमंत्रिपदासह) + 3 राज्यमंत्री – एकूण 12 + विधानसभा अध्यक्षपद

  • गृह, अर्थ, उद्योग एका पक्षाकडे असण्याची शक्यता (राष्ट्रवादी)
  • महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा दुसऱ्या पक्षाकडे असण्याची शक्यता (काँग्रेस)
  • नगरविकास, जलसंपदा, MSRDC तिसऱ्या पक्षाला दिलं जाण्याची शक्यता (शिवसेना)
  • ग्रामीण भागाशी संबंधित कृषी, सहकार, ग्राम विकास ही खाती प्रत्येकी एका पक्षाला मिळू शकतात

शिवसेनेतील मंत्रिपदाचे संभाव्य दावेदार

शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार दिला जाण्याची शक्यता आहे. रवींद्र वायकर यांची नगरविकास मंत्रिपदी वर्णी लागू शकते. तर सुभाष देसाई यांना उद्योग, अब्दुल सत्तार यांना अल्पसंख्याक मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय उदय सामंत यांना गृहनिर्माण मंत्रिमंडळाचा कारभार कारभार दिला जाण्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेसमधून संभाव्य नावं कोणाची?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची चिन्हं आहेत. तर कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रालय सुपूर्द केलं जाण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक यांना कामगार मंत्रालय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना महसूल खात्याचा कारभार दिला जाण्याचे संकेत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी या काँग्रेस आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI