राष्ट्रवादी पुन्हा…. भाजप नेत्याच्या कार्यक्रमात वाजलं राष्ट्रवादीचं गाणं; अजित पवार म्हणाले…

यावर राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी पुन्हा.... भाजप नेत्याच्या कार्यक्रमात वाजलं राष्ट्रवादीचं गाणं; अजित पवार म्हणाले...
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 5:26 PM

पुणे : भाजप नेत्याच्या कार्यक्रमात वाजलं राष्ट्रवादीचं गाणं वाजल आहे. पुण्यात हा प्रकार घडला आहे. कार्यक्रमासाठी भाजप नेत्याची एन्ट्री झाली आणि डीजेवर राष्ट्रवादीचं गाणं सुरु झालं. यामुळे सकगळेच जण गोंधळून गेले. तात्काळ हे गाण बंद करण्यात आले. यानंतर पोलिसांनी या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीमची अरेंजमेंट करणाऱ्या डीजेला ताब्यात घेतले. यावर राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात भाजपच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. दिवाळी निमित्त भाजप तर्फे पुण्यातील रास्ता पेठेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजप नेते तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील या कार्यक्रमाला प्रमुख अथिती म्हणून उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील कार्यक्रमस्थळी दाखल होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार गीत सुरु झाले. यामुळे सगळेच गोंधळून गेले. यानंतर तात्काळ हे गाणं बंद करण्यात आले.

कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी साऊंड सिस्टीमची अरेंजमेंट करणाऱ्या डीजेला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डी जे ने साऊंड सिस्टीम विनापरवाना उभारली त्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जर कार्यक्रमात राष्ट्रवादीच गाणं वाजलं तर बिघडलं कुठं? कधी कधी एखाद्या कार्यक्रमात होतं एवढ त्याला महत्व देण्याची गरज नाही असे अजित पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.