खडसेंचं धक्कादायक विधान, राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता अमित शाहांना भेटणार

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांनी अमित शाह यांच्या भेटीच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

खडसेंचं धक्कादायक विधान, राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता अमित शाहांना भेटणार
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 12:52 PM

रवी गोरे, TV9 मराठी, प्रतिनिधी, मुक्ताईनगर : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अमित शाह यांच्या भेटीच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. अमित शाह यांना फक्त मी नाही तर शरद पवारही (Sharad Pawar) भेटणार असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. मी अमित शहा यांच्या भेटीबाबत शरद पवारांना पूर्ण कल्पना दिली आहे. शरद पवारही माझ्यासोबत भेटीला अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीला येणार आहेत, असं खडसे म्हणाले आहेत.

रक्षाताईंनी मला सांगितलं अमित शहा यांच्या ऑफिस बाहेर तीन तास बसून ठेवलं. भेट झाली नाही, असं महाजन म्हणाले. याबाबत मी रक्षा खडसेंना विचारलं. महाजनांसोबत मी कुठलीही चर्चा केलेली नाही, असं रक्षा खडसेंनी सांगितल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.

गिरीश महाजन यांना कुठल्याही मिटवण्याच्या विषयावर मी बोललो नाही, असं स्पष्टीकरण खडसे यांनी दिलं आहे.

नाशिकच्या सभेनंतरही मी त्यांच्या भेटीबाबत देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केली. देवेंद्र फडणवीस यांची मी भेट घेणार आहे. भेटीचे कारण राजकीय नाही. अन्य विषयांवर चर्चा मी त्यांच्याशी करणार आहे, असंही खडसेंनी सांगितलं.

अफवांवर विश्वास ठेवू नका. मी कुठेही जाणार नाही. मी पन्नास खोके घेऊन कुठे जाणारा माणूस नाही, असं म्हणत खडसेंनी शिंदेगटालाही टोला लगावला आहे.

जनतेला माझ्यावर विश्वास आहे. नाथाभाऊ हा पक्ष सोडणारा माणूस नाही. मी खोक्यावर विकणारा माणूस नाही. ज्या पक्षाने मला राजकीय प्रतिष्ठा परत मिळून दिली त्या पक्षाला त्याग करून जाईल, असं आता तरी कुठलं वातावरण नाही. मी असला फालतू विचारही कधी करणार नाही, असं म्हणत खडसेंनी पुन्हा भाजपत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय.

Non Stop LIVE Update
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.