शिवरायांचा इतिहास अपमानित करण्याचे नियोजनबद्ध कारस्थान, राष्ट्रवादी आमदाराचा घणाघात! नवे वक्तव्य, नवा वाद!

मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची परत छेडछाड केली आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असं अमोल मिटकरी म्हणाले.

शिवरायांचा इतिहास अपमानित करण्याचे नियोजनबद्ध कारस्थान, राष्ट्रवादी आमदाराचा घणाघात! नवे वक्तव्य, नवा वाद!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 2:26 PM

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) इतिहासाला अपमानित करण्याचे नियोजनबद्ध कारस्थान सुरु आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या आजच्या एका वक्तव्यानंतर अमोल मिटकरी यांनी अशा शब्दात संपात व्यक्त केला आहे. साताऱ्यात किल्ले प्रताप गडावर आज शिवप्रताप दिनाचा कार्यक्रम होता. यावेळी भाषणादरम्यान मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी छत्रपती शिवाजी महाराजी महाराज यांच्या आग्रा सुटकेच्या प्रसंगाची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली. त्यावरून राजकीय वर्तुळातून तीव्र आक्षेप नोंदवले जात आहेत.

अमोल मिटकरी यांनी टीव्ही 9 बोलनाता प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, ‘ अत्यंत दुर्दैवी वक्तव्य आहे. मंगल प्रभात लोढा आणि शिवरायांच्या इतिहासाचा काहीही संबंध नाही. त्यांच्याकडे पर्यटन खातं असलं तरीही त्यांच्याकडे तेवढी बुद्धीमत्ता असेल असं यातून जाणवत नाही…

हेच ते वादग्रस्त वक्तव्य-

छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यातून केलेली सुटका हे महाराजांचं कौशल्य होतं. पण महाराजांनी गद्दारी केली नव्हती. स्वराज्य वाचवण्याकरिता केलेलं नियोजन होतं. त्याची तुलना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाशी करणार असाल तर हे अत्यंत संतापजनक वक्तव्य आहे.

राज्यपालांनी जे वक्तव्य करून शिवरायांचा अपमान केला आहे. त्याच पद्धतीने चुकीचा संदर्भ देऊन मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची परत छेडछाड केली आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असं अमोल मिटकरी म्हणाले.

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.