मुंबई: भाजपचे नेते राम कदमांनी (Ram Kadam) पोलिसांना मारहाण करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्यानं राम कदमांचा आता निषेध नोंदवण्यात आलाय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीही भाजपचे नेते राम कदमांवर निशाणा साधलाय. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी ट्विट करत राम कदमांवर हल्लाबोल केलाय. (NCP MLA Criticize Ram Kadam Over Police Statement; Rohit Pawar Says )
मुंबई पोलिसांना माफिया म्हणणाऱ्यांच्या बाजूने भाजपच्या नेत्यांनी यापूर्वी आंदोलन केलं. आता मुंबई पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कारवाई करू नका, म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेलीय. यावरुनच यांची विचारसरणी कशी आहे, हे लोकांना समजतंय. यापलीकडं आपण काय बोलणार?, असं रोहित पवार ट्विट करत म्हणालेत.
दुसरीकडे युवासेनेकडून राम कदमांचा निषेध नोंदवण्यात आलाय. वरळीत युवासेनेकडून भाजप नेते आणि आमदार राम कदमांच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आलाय. आमदार राम कदम यांच्याविरोधात तुफान नारेबाजीसुद्धा करण्यात आलीय. भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांची मानसिकता ही गुंड प्रवृत्तीची असल्याचंही युवासेनेनं सांगितलंय.
मुंबई पोलिसांना माफिया म्हणणाऱ्यांच्या बाजूने भाजपच्या नेत्यांनी यापूर्वी आंदोलन केलं. आता मुंबई पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कारवाई करू नका, म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेलीय. यावरुनच यांची विचारसरणी कशी आहे, हे लोकांना समजतंय. यापलीकडं आपण काय बोलणार?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 12, 2021
काय आहे प्रकरण?
पवई पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. नितीन खैरमोडे असे मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. पवई हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एक ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला ट्रिपल सीट हे कार्यकर्ते जात असताना धडकले होते. यावेळी घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले. त्यांनी आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभरला ताब्यात घेतले. रिक्षाने जात असताना नितीन खैरमोडे या कॉन्स्टेबलला त्या आरोपींनी रिक्षातच मारहाण केली. त्यांच्या तोंडावर आणि गालावर हातातील कडे मारले.
या वेळी नितीन यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले आणि तेव्हाच या तिघांनी रिक्षातून पळ काढला. मात्र मागून येणाऱ्या पोलिसांनी सचिनला पकडले आणि दिपू आणि आयुष तिथून फरार झाले. सध्या पवई पोलीस या दोघांचा शोध घेत आहे. हे तिघे ही भाजपचे कार्यकर्ते असून, घाटकोपर आणि विक्रोळी परिसरात कार्यरत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा, पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, असे गुन्हे दाखल केले असून, पुढील कारवाई करीत आहेत.
संबंधित बातम्या
पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींसाठी भाजप नेते राम कदमांचा फोन
राम कदमांमुळे भाजपची पुन्हा पुन्हा डोकेदुखी?
NCP MLA Criticize Ram Kadam Over Police Statement; Rohit Pawar Says