Kirit Somaiya : एकही झाड न कापता आरे कारशेड उभा राहणार, ‘एनजीओ’ भूमिके बाबत सोमय्यांकडून सवाल उपस्थित

जागेच्या वादावरुन गेल्या तीन वर्षापासून मेट्रोचे काम रखडलेले आहे. केवळ अर्थार्जनाच्या उद्देशाने याकडे पाहिले जात आहे. एनजीओ ची भूमिका असती तर पाठिंबा दिला असता पण कुणाच्या तरी सांगण्यावरुन विरोध करणे हे चुकीचे आहे. शिवाय हा प्रकल्प थांबला तर प्रकल्पाच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे आता प्रकल्प वेळेवर होणे गरजेचे आहे.

Kirit Somaiya : एकही झाड न कापता आरे कारशेड उभा राहणार, 'एनजीओ' भूमिके बाबत सोमय्यांकडून सवाल उपस्थित
भाजपा नेते किरीट सोमय्याImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 1:13 PM

मुंबई : सरकार बदलले की धोरणे बदलली. त्यानुसार पुन्हा (Aarey metro car shed) आरे कारशेडला मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतला असला तरी आता (NGO) एनजीओ यांनी या प्रकल्पाचे काम थांबवले आहे. मात्र, हे सर्व संशयास्पद असल्याचा आरोप भाजपाचे (Kirit Somaiya) किरीट सोमय्या यांनी केला आहे. एकही नवीन झाड पाडावे लागणार नसल्याचे राज्याचे मुख्यमंत्री सांगत असताना एनजीओची अशी भूमिका का? असा सवाल उपस्थित केला असून या एनजीओ च्या मागे कुणाचा हात असे म्हणत सोमय्या यांनी अप्रत्यक्ष ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. आरे कारशेड संबंधात स्वतःला एनजीओ म्हणवणारे यांनी गेली 3 वर्ष काम थांबवले त्यामुळे तब्बल 43 कोटींचा प्रकल्पही रखडला असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

‘एनजीओ’ ला बळ कुणाचे?

आरे कारशेड उभारणीला आता एनजीओ आणि वृक्षप्रेमींचा विरोध होत असल्याचे पुढे येत आहे. मात्र, यामुळे होणारे नुकसानही लक्षात घेणे गरजेचे आहे. हा प्रकल्प उभारणीसाठी 60 हजार कोटींचा खर्च येणार असल्याचे सांगितले जात आहे पण हा आकडा आला कोठून असा सवाल उपस्थित होत आहे. आरे कारशेडला सुप्रीम कोर्टाची परवानगी असतानाही विरोध होत असेल तर या एनजीओ च्या मागे कुणाचा तरी हात असल्याचा आरोप करीत सोमय्या यांनी अप्रत्यक्ष ठाकरे यांच्याकडेच बोट केले आहे. राज्यात सत्तापरिवर्तन होताच आरे कारशेडला परवानगी देण्यात आली होती. तेव्हापासून एनजीओ या विरोधाक रस्त्यावर उतरली आहे.

प्रकल्प थांबला तर किंमतीमध्ये वाढ

जागेच्या वादावरुन गेल्या तीन वर्षापासून मेट्रोचे काम रखडलेले आहे. केवळ अर्थार्जनाच्या उद्देशाने याकडे पाहिले जात आहे. एनजीओ ची भूमिका असती तर पाठिंबा दिला असता पण कुणाच्या तरी सांगण्यावरुन विरोध करणे हे चुकीचे आहे. शिवाय हा प्रकल्प थांबला तर प्रकल्पाच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे आता प्रकल्प वेळेवर होणे गरजेचे आहे. शिवाय पर्यावरण संवर्धनाची काळजी ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही असल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

संजय पांडे यांच्यावर कारवाई अटळ

माजी कमिशनर संजय पांडे यांना आज ना उद्या चौकशीला सामोरे हे जावेच लागणार आहे. ते किती दिवस पळणार , शिवाय त्यांनी 13 हजार कोटींचा घोटाळा केला आहे. त्यामुळे एवढ्या सहजासहजी सुटका होणार नाही. त्यांना चौकशीला तर सामोरे जावेच लागणार अन् गुन्हा दाखल झाला तर मग कारवाई अटळ असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.