गडकरी-फडणवीस यांनी हवेत कोविड हॉस्पिटल बांधली का?, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

गडकरी आणि फडणवीस यांनी कोविड हॉस्पिटल बांधलीत, असे पत्रकारांनी सांगितले असता विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:49 PM, 17 Apr 2021
गडकरी-फडणवीस यांनी हवेत कोविड हॉस्पिटल बांधली का?, विजय वडेट्टीवारांचा घणाघात
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसनमंत्री

भंडाराः नितीन गडकरी- देवेंद्र फडणवीस यांनी हवेत कोविड हॉस्पिटल बांधली का?, असा सवाल काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपस्थित केलाय. गडकरी आणि फडणवीस यांनी कोविड हॉस्पिटल बांधलीत, असे पत्रकारांनी सांगितले असता विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस-गडकरींनी बांधलेली हॉस्पिटल आम्हाला दिसत नाही, असेही ते म्हणाले. (Nitin Gadkari Devendra Fadnavis Build Covid Hospital In The Air Says Vijay Wadettiwar)

अनावश्यक घराबाहेर फिराल तर पोलिसांना भिडाल

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांनी बातचीत केली, त्यावेळी ते बोलत होते. सोमवारपासून अनावश्यक घराबाहेर फिराल तर पोलिसांना भिडाल, असा इशाराही त्यांनी जनतेला दिलाय. सोमवारपासून अनावश्यक फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. लोक घाबरून जाऊ नयेत म्हणून सरकार नरमाईने वागत होते, मात्र लोक ऐकत नसून सोमवारपासून कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याची स्थिती हाताबाहेर

ऑक्सिजनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत फोनवर चर्चा झाली असून, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी लष्करी मदत ही मागितली. मात्र केंद्राकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या उल्लेख वड्डेट्टीवार यांनी केला. गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याची स्थिती हाताबाहेर गेल्याचंही त्यांनी सांगितलं.

ऑक्सिजन अभावी 15 रुग्णांचा मृत्यू

गोंदियातील वैद्यकिय महाविद्यालयात काल 29 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ऑक्सिजन अभावी 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती काल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र हे वृत्त खोटे असल्याचा दावा हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे. स्वत: विजय वडेट्टीवार यांनी गोंदियातील 29 मृतांमध्ये बाहेरील राज्यातील लोकांचा समावेश असल्याचं म्हटलं होतं. तसेच ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचं वृत्त खोटं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

मध्यप्रदेशातील रुग्ण

गोंदियात लगत असलेल्या मध्यप्रदेशातून कोरोनाचे गंभीर रुग्ण उपचारासाठी गोंदियात येतात. खासगी रुग्णालये गंभीर रुग्णांना भरती करून घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल केले जात आहे. गंभीर आजारी असलेले रुग्ण रुग्णालयात उशिराने उपचारासाठी येतात. त्यामुळे त्यांना वाचवणे कठिण जाते, असं वडेट्टीवार म्हणाले. मात्र, काल दगावलेले सर्वच्या सर्व 29 रुग्ण गोंदियातील नाहीत. मध्यप्रदेशातील रुग्णांचाही त्यात समावेश आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

रेमडेसिवीरच्या नावाने पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे पाणी, 35 हजारांना बनावट इंजेक्शची विक्री, बारामतीत टोळीचा पर्दाफाश

कोरोनाची तिसरी लाट कधीही उसळेल, कायमस्वरुपी नियोजन करा, उद्धव ठाकरेंचं उद्योगांना आवाहन

Nitin Gadkari Devendra Fadnavis Build Covid Hospital In The Air Says Vijay Wadettiwar