बावनकुळे इतके हुशार, मग तिकीट का कापलं? हे कसले चौकीदार, हे तर थकबाकीदार : नितीन राऊत

28 हजार कोटी रुपये केंद्र सरकार आमचं देणं आहे. केंद्रानं ते पैसे दिल्यास आम्ही कधीही वीजबिल माफी करायला तयार आहोत. (Nitin Raut Criticize On Chandrashekhar Bawankule On Light Bill Issue)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:37 PM, 20 Nov 2020
बावनकुळे इतके हुशार, मग तिकीट का कापलं? हे कसले चौकीदार, हे तर थकबाकीदार : नितीन राऊत

मुंबईः मागील ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा अभ्यास इतकाच चांगला असेल, त्यांनी इतकंच भारी काम केलं असेल, तर मग त्यांना तुम्ही विधानसभेला तिकीट का नाही दिलं?, असा प्रश्न ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊतांनी उपस्थित केला आहे. (Nitin Raut Criticize On Chandrashekhar Bawankule On Light Bill Issue)

टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत बोलत होते. 28 हजार कोटी रुपये केंद्र सरकारचं देणं आहे. केंद्रानं ते पैसे दिल्यास आम्ही कधीही वीजबिल माफी करायला तयार आहोत. भाजपनं जीएसटी थकबाकीच्या वसुलीसाठी आंदोलन केलं पाहिजे. हे म्हणतात आम्ही चौकीदार आहोत. हे कसले चौकीदार हे तर जीएसटीचे थकबाकीदार आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही, असं म्हणत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

मीटर रीडिंगप्रमाणे जी वीजबिलं आली आहेत, ती भरली गेलीच पाहिजेत. महाविकास आघाडीचं हे गरिबांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे, जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे. मागच्या सरकारनं कर्जाचा डोंगर उभा करून ठेवलेला आहे. त्यामुळे आजची परिस्थिती वीजबिल माफीसारखी नाही. भाजपचं हे पाप आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

नेहमी हे लोक म्हणतात आमचा अभ्यास दांडगा आहे. आम्ही सगळ्यात जास्त चांगलं काम करतो. तुम्ही मग मागच्या मंत्र्यांना तिकीट का दिलं नाही. त्यांना विधानसभेचे तिकीट द्यायलाच हवं होतं आणि पुन्हा त्यांना प्रस्थापित करायला पाहिजे होतं. तुम्ही त्यांचं ऐन वेळी तिकीट का कापलं. आता म्हणता तुम्ही खूप चांगलं काम झालेलं आहे. मागच्या ऊर्जामंत्र्यांना हीच तुमची शाबासकी आहे का?, हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झालेला आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.

जीएसटीचे पैसे केंद्रानं अद्याप दिलेले नाहीत. 100 युनिट वीजबिल माफीबाबत गट तयार करण्यात आला आहे. कोरोना काळात गटाच्या बैठका झाल्या नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. वाढीव बीजबिलाच्या मुद्द्यावरून भाजपने आंदोलन सुरू केलं असून मंत्रालयावरही मोर्चा आणण्याचा इशारा भाजपने दिला आहे. त्याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे, असं राऊत यांना विचारलं असता भाजपने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले तर आनंदच होईल. कारण मी केंद्राला वारंवार पत्र लिहून ऊर्जा विभागाकडे 10 हजार कोटींच्या अनुदानाची मागणी केली.

संबंधित बातम्या:

वीज ग्राहक आमचा देव; त्यांचे आम्ही नुकसान करणार नाही : नितीन राऊत

‘महावितरणचे 67 हजार कोटी रुपये भाजप सरकारच्या काळातच थकीत’, जयंत पाटलांचा भाजपवर पलटवार

(Nitin Raut Criticize On Chandrashekhar Bawankule On Light Bill Issue)