“राज ठाकरे खरंच या देशाचे नागरिक आहेत का?” लक्ष्मण हाकेंचा सवाल, म्हणाले “प्रबोधनकारांच्या घरात जन्म…”

तुम्ही जर महाराष्ट्राच्या नावाने पक्ष चालवत असाल आणि अशाप्रकारे बेजबाबदार वक्तव्य करत असाल तर तुमच्या पक्षाला आमच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या पक्ष वाढीलाही आमच्या हार्दिक शुभेच्छा", असा टोला लक्ष्मण हाके यांनी लगावला.

राज ठाकरे खरंच या देशाचे नागरिक आहेत का? लक्ष्मण हाकेंचा सवाल, म्हणाले प्रबोधनकारांच्या घरात जन्म...
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 3:59 PM

Laxman Hake on Raj Thackeray Reservation : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांनी काल सोलापूर दौरा केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही, असे वक्तव्य केले. आता यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे खरंच या देशाचे नागरिक आहेत का? असा सवाल लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केला आहे.

लक्ष्मण हाके यांनी नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी “राज ठाकरे यांचा जन्म प्रबोधनकार ठाकरे यांच्या घरात झाला आहे. पण तरीही ते अशाप्रकारची बेजबाबदार किंवा असंविधानिक वक्तव्य करत आहात, याची कीव करावीशी वाटते. राज ठाकरे खरंच या देशाचे नागरिक आहेत का? तुम्ही एक पक्ष चालवत आहात, ज्या महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेपैकी जवळपास ८० टक्के जनता ही आरक्षणाच्या अंतर्गत येते. पण तुम्ही जर महाराष्ट्राच्या नावाने पक्ष चालवत असाल आणि अशाप्रकारे बेजबाबदार वक्तव्य करत असाल तर तुमच्या पक्षाला आमच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या पक्ष वाढीलाही आमच्या हार्दिक शुभेच्छा”, असा टोला लक्ष्मण हाके यांनी लगावला.

“राज ठाकरे यांनी जाणीवपूर्वक वक्तव्य केलं आहे की ते खरोखरंच अज्ञानी आहेत, याबद्दल मी जर त्यांना भेटलो तर नक्की विचारेन. आरक्षण हे का, कधी, कोणाला, कसा दिला जातो आणि संविधानाला काय अपेक्षित आहे, या गोष्टी मी राज ठाकरेंना कार्यकर्ता म्हणून नक्की समजवून सांगेन. जर तुम्हाला पक्ष चालवायचा असेल, तर तुम्ही पक्ष चालवण्यापेक्षा एखादी संस्था चालवा किंवा एखादी NGO चालवा”, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटलं.

राज ठाकरे काय म्हणाले?

“बाहेरच्या राज्यातून मुलं येतात. आपल्या नोकऱ्या बळकावतात. आपल्या राज्यात शिक्षण घेतात, आपल्या मुला-मुलींना शिक्षण, रोजगार मिळत नाही, याचा आपण विचार केला पाहिजे. महाराष्ट्रात सर्व गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यांसह संपूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रकारचे उड्डाणपूल होत आहेत, हे का होतं? या सर्व गोष्टी मूळच्या लोकसंख्येसाठी होत नाही, बाहेरुन आलेल्या लोकसंख्येसाठी होतात. आपल्या राज्याचा सर्वाधिक पैसा हा बाहेरून आलेल्या लोकांवर खर्च होतो”, असे राज ठाकरे म्हणाले होते.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.