मराठा समाजाकडून आरक्षणाचा खेळखंडोबा, ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध : प्रकाश शेंडगे

SEBCचं बिल पास झालं, तेव्हा मराठा समाजाने ढोल बडवले, पेढे वाटले, साखर वाटली आणि आत्ता उपरती झाली. हे ओबीसी समाज कधीही सहन करणार नसल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

मराठा समाजाकडून आरक्षणाचा खेळखंडोबा, ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध : प्रकाश शेंडगे

मुंबईः ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यास माझा तीव्र विरोध आहे. 3 नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिला आहे. टीव्ही 9 मराठीशी बातचीत करताना त्यांनी मराठ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. (Prakash Shendge On Maratha Reservation)

वारंवार अशा मागण्या करून मराठा समाजाने आरक्षणाचा खेळखंडोबा केला. 30 वर्षांपूर्वीही अशीच मागणी केली होती, त्यावेळीही संघर्ष पेटला होता, आता पुन्हा हेच होतंय, या मराठ्यांचा बोलवता धनी कुणी दुसराच आहे, ज्याला आरक्षण द्यायचं नाहीये, अशी टीकाही त्यांनी केली आहे. SEBCचं बिल पास झालं, तेव्हा मराठा समाजाने ढोल बडवले, पेढे वाटले, साखर वाटली आणि आत्ता उपरती झाली. हे ओबीसी समाज कधीही सहन करणार नसल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

कायद्यात अशी तरतूद आहे की ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही, महाराष्ट्रात दोन समाजांत द्वेष निर्माण करण्याचं काम काही जण करत आहेत. ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवण्याचं षडयंत्र सुरू आहे. मराठा समाजाचं राजकारण होतंय, ओबीसी समाजाचं ताट खेचण्याचा प्रयत्न होतोय, त्यांना SEBCतून आरक्षण मिळू शकतं. या मुद्द्यावर आम्ही ओबीसी समाज बचाव आंदोलन करणार आहोत. 3 तारखेला सर्व तलाठी, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करू, असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला आहे.

अजित पवार 5 मिनिटांत सारथीला निधी देऊ शकतात, पण ओबीसी समाजाचा प्रलंबित मागण्यासाठी सरकारला मुहूर्त सापडत नाही. कालच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला नाही. हे सोपस्कार सरकार का करतेय, असा सवालच प्रकाशअण्णा शेंडगेंनी उपस्थित केला आहे.

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?; विजय वडेट्टीवारांचा सवाल

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?, असा थेट सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी केला आहे. मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसींसह इतर मुलांचं वय वाढत चाललंय, त्यांना वेठीस धरायला नको, असंही विजय वडेट्टीवारांनी सांगितलं आहे.

फक्त मराठा समाज SEBC नाही, तर आम्हीसुद्धा SEBC आहोत- हरिभाऊ राठोड

दुसरीकडे मराठा आरक्षणावर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनीसुद्धा भाजपला धारेवर धरलं आहे. फक्त मराठा समाज SEBC नाही, तर आम्हीसुद्धा SEBC आहोत. भटके, विमुक्त, बारा बलुतेदार, धनगर हे सगळे SEBC आहेत, असं ओबीसी नेते हरिभाऊ राठोड म्हणाले आहेत. मोदी साहेबांनी घटनादुरुस्तीत ओबीसीची टर्म काढून टाकली. तसंही आम्ही SEBC होतो आणि आताही आहे, पण मधल्या काळात भाजपानं लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला, असा घणाघात हरिभाऊ राठोड यांनी भाजपवर केला आहे.

SEBC चा लाँग फॉर्म कधी दिला नाही. मराठ्यांना आम्ही SEBC देतो म्हणजे काही तरी वेगळं देतो असं ते सांगत होते. पण मधल्या काळात भाजपानं लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी आरक्षणाच्या बाबतीत वक्तव्य केलं आहे. आरक्षण हे लोकसंख्येनुसार सगळ्यांना देता येईल. मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचे असल्यास लोकसंख्येची गणना करावी लागेल, आपल्याला 2021च्या लोकसंख्येच्या गणनेची वाट बघायची गरज नाही. आपण आठ दिवसांतही लोकसंख्येची गणना करू शकतो, असंही हरिभाऊ राठोड यांनी अधोरेखित केलं आहे.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात सर्व सामर्थ्याने लढा देत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. उमरगा ते मुंबई असा 580  कि.मी.चा पायी प्रवास करून आलेल्या मराठा तरुणांची भेट घेऊन त्यांना आरक्षणासंदर्भात शासन करत असलेल्या कार्यवाहीची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.  तसंच हे सरकार तुमचंच असून तुमच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

मोठी बातमी: मराठा आरक्षणावरुन आंदोलक आक्रमक; 7 नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार मशाल मोर्चा

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे आक्रमक झालेले मराठा आंदोलक आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर धडकणार आहेत. येत्या 7 नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चाकडून मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्वपक्षीय मराठा आमदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?; विजय वडेट्टीवारांचा सवाल

SEBC आणि OBC एकच, भाजपने मूर्ख बनवलं, नितीश कुमारांचा जो मुद्दा, तोच माझाही मुद्दा : हरिभाऊ राठोड

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *