कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये: शरद पवार

दोन व्यापारी प्रतिनिधी, दोन शेतकरी प्रतिनिधी यांना घेऊन केंद्रातल्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं आहे.

  • चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक
  • Published On - 13:56 PM, 28 Oct 2020
Sharad Pawar on corona

नाशिक : कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये; कांद्याबाबतचे बहुतेक निर्णय हे केंद्र सरकारच्या हातात असतात, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. बाजारातील चढ-उतार याची सर्वाधिक झळ कांद्याला बसते. दोन व्यापारी प्रतिनिधी, दोन शेतकरी प्रतिनिधी यांना घेऊन केंद्रातल्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं. (Sharad Pawar On Onion Issue)

राज्यात कांदा व्यापाऱ्यांवर केंद्राच्या सांगण्यावरून धाडी टाकण्यात येत आहेत. राज्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी निर्यातबंदी आणि आयातीचा निर्णय केंद्रीय पातळीवरच होत असल्याचंही निदर्शनास आणून दिलं. कांद्याचा थोडा भाव वाढला की इन्कम टॅक्सवाल्यांच्या काही गोष्टी ऐकू येतात, मार्केट चालू ठेवा, अडचणी एकत्र बसून सोडवू, तुम्हाला त्रास झाला म्हणून उत्पादकाला त्रास व्हावा अशी तुमची भावना नाही. त्यामुळे थोडं नमतं घ्या, असा सल्लाही त्यांनी कांद्याच्या व्यापाऱ्यांना दिला आहे.

या व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचा राज्य सरकारचा संबंध नाही, असं पवार म्हणाले. निर्यात बंदी, आयात या संदर्भातील निर्णय राष्ट्रीय पातळीवर होतात, याकडेही त्यांनी शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष वेधले. कांद्याचे भाव वाढल्यानंतर विरोधकांनी सभागृहात ‘शरद पवार होश मे आव’ अशा घोषणा दिल्या होत्या. कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन पैसे मिळण्याची वेळ येते तेव्हा संसदेत चळवळ होते, असंही ते म्हणाले. स्टॉक लिमिट प्रश्नासंदर्भात आज मी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे. दोन व्यापारी प्रतिनिधी, दोन शेतकरी प्रतिनिधी यांना घेऊन केंद्रातल्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी निर्यातबंदी आणि आयातीचा निर्णय केंद्रीय पातळीवरच होत असल्याचंही निदर्शनास आणून दिलं. कांद्याचा थोडा भाव वाढला की इन्कम टॅक्सवाल्यांच्या काही गोष्टी ऐकू येतात, मार्केट चालू ठेवा, अडचणी एकत्र बसून सोडवू, तुम्हाला त्रास झाला म्हणून उत्पादकाला त्रास व्हावा अशी तुमची भावना नाही. त्यामुळे थोडं नमतं घ्या, असा सल्लाही त्यांनी कांद्याच्या व्यापाऱ्यांना दिला आहे.

संबंधित बातम्या:

व्यापाऱ्यांवरील धाडी केंद्राच्या सांगण्यावरून; राज्याचा संबंध नाही: शरद पवार

LIVE | शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र

कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये: शरद पवार