येत्या काळात एकट्याला सत्ता स्थापण्याची संधी; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

महाराष्ट्रात येत्या काळात एकट्याची सत्ता बसविण्याची संधी, देवेंद्र फडणवीसांचं विधान Opportunity To Establish Power Alone In The Coming Period; Big Statement Devendra Fadnavis

  • विठ्ठल देशमुख, टीव्ही 9 मराठी, वाशिम
  • Published On - 13:33 PM, 5 Dec 2020
Devendra Fadnavis Attacks

वाशिमः येत्या काळात महाराष्ट्रामध्ये एकट्याला सत्तेवर बसविण्याची संधी तिन्ही पक्षांनी दिली असून, त्याचा फायदा घेणार असल्याचं मोठं विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत आम्ही स्वतःच्या ताकदीवर दोन जागा मिळविल्या आहेत, तसेच हैदराबाद इथं झालेल्या निवडणुकीत ही प्रचंड मोठं यश मिळालं आहे, असंसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलं आहे. (Opportunity To Establish Power Alone In The Coming Period; Big Statement Devendra Fadnavis)

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हिंगोली जिल्ह्यात लग्न समारंभासाठी जात होते. त्यादरम्यान वाशीम इथं आमदार राजेंद्र पाटणी यांच्या घरी कार्यकर्त्यासोबत बोलत होते. चार जागा फक्त दूर राहिलो आणि दक्षिणेतही आपल्याला प्रचंड मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्रात येत्या काळात एकट्याची सत्ता बसविण्याची संधी या तीन पक्षांनी दिली आहे. त्या संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

फडणवीस-शेलार जोडगोळी हैदराबाद मोहिमेवर

देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार ही जोडगोळी महाराष्ट्रात रणनीती आखते हे एव्हाना अनेक निवडणुकांमध्ये दिसून आलं आहे. मात्र आता त्यांच्या रणनीतीचा फायदा भाजप राष्ट्रीय स्तरावर घेत आहे. देवेंद्र फडणवीसांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचं प्रभारीपद भूषवलं, तिथे भाजपने विजय मिळवला. त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार हैदराबाद मोहिमेवर गेले. Opportunity To Establish Power Alone In The Coming Period; Big Statement Devendra Fadnavis

शिवसेनेसाठी धोक्याची घंटा का?

हैदराबादची निवडणूक ही भाजपने सर्वशक्तीने लढली असली तरी ती शिवसेनेसाठी लिटमस टेस्ट म्हणता येईल. कारण पाच वर्षापूर्वी केवळ 4 जागा जिंकणाऱ्या भाजपने हैदराबादेत 48 जागा जिंकून, मुंबईतील लढाईसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. जर हैदराबादसारख्या निवडणुकीत अमित शाह, जे पी नड्डा, योगी आदित्यनाथ हे मैदानात उतरु शकतात, तर आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईच्या निवडणुकीत कोण कोण उतरु शकतं याचा अंदाज बांधता येईल.

फडणवीस-शेलारांची रणनीती

जे देवेंद्र फडणवीस बिहार आणि हैदाराबादच्या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरु शकतात, ते मुंबई महापालिका निवडणुकीत पायाला भिंगरी बांधणार हे निश्चित आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस दुसरीकडे आशिष शेलार आणि नव्याने जबाबादीर सोपवलेले अतुल भातखळकर अशी भाजपची फौज ग्राऊंडवर असेल. त्यांच्या दिमतीला महाराष्ट्रातील 105 आमदार, भाजपचे खासदार, आजूबाजूच्या राज्यातील मुख्यमंत्री, केंद्रातील मंत्री, अमित शाह, योगी आदित्यनाथ, जे पी नड्डा हे असतीलच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरले तर आश्चर्य वाटायला नको.

Opportunity To Establish Power Alone In The Coming Period; Big Statement Devendra Fadnavis

संबंधित बातम्या 

Opinion : हैदराबादचा निकाल, शिवसेनेसाठी धोक्याची घंटा का?

‘हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे’, ओवेसींचा गड असलेल्या हैदराबादेत योगी आदित्यनाथांची गर्जना