शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, आमचं हिंदुत्व राजकीय नाही; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

घंटा वाजवली म्हणजे हिंदुत्व, शेंडी आणि जानवं घातलं म्हणजे हिंदुत्व तर तसं नाही. राजकारणासाठी शिवसेनेनं हिंदुत्वाचा वापर केला, असं मला वाटत नाही, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, आमचं हिंदुत्व राजकीय नाही; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबईः शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, आमचं हिंदुत्व राजकीय नाही. भाजपावाल्यांनी संघाकडून हिंदुत्व शिकावं, असा टोला शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतून त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. (Sanjay Raut On Bjp Hindutva)

एक वर्षापर्यंत आम्ही दोघे हिंदुत्ववादी होतो. तेव्हाही आम्ही आक्रमकपणे हिंदुत्व मांडत होतो. हिंदुत्व तुम्ही कशा प्रकारे अंमलात आणताय, आमचं राजकीय हिंदुत्व नाही हे सगळ्यांना माहीत आहे, अशी टीकासुद्धा त्यांनी भाजपवर केली आहे.

30 वर्षांपूर्वी हिंदुत्वाचं वारं वाहू लागलं होतं, तेव्हा इराणमध्ये खोमेनी यांचा उदय झाला होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, मला हिंदूंचा खोमेनी व्हायचं नाही आहे. माझं हिंदुत्व आहे ते वेगळं हिंदुत्व आहे. माझं हिंदुत्व फक्त घंटा वाजवणारं हिंदुत्व नाही. घंटा वाजवली म्हणजे हिंदुत्व, शेंडी आणि जानवं घातलं म्हणजे हिंदुत्व तर तसं नाही. राजकारणासाठी शिवसेनेनं हिंदुत्वाचा वापर केला, असं मला वाटत नाही, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

जर कोणी करत असेल तर आम्ही त्यांना थांबवलं नाही. संघाकडून आम्हाला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. आम्ही हिंदू आहोतच. पण ज्या पद्धतीच्या हिंदुत्वाचा आधार दिल्लीतील राज्यकर्ते आणि महाराष्ट्रातला विरोधी पक्ष घेत आहेत. त्यांनी सरसंघचालकांकडूनही काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. आरएसएस असेल, विश्व हिंदू परिषद असेल प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काही विषय पुढे घेऊन गेले आहेत. आम्ही कधीही अकारण एकमेकांवर टीकाटिपण्णी केली नाही. कारण शेवटी हिंदुत्वाचा विचार पुढे जाणं महत्त्वाचं असल्याचंही संजय राऊतांनी अधोरेखित केले आहे.

युतीचे सरकार होते तेव्हा पण बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवतायत, असाच आरोप केला जात होतो, आता जेव्हा तीन पक्षांचे सरकार आहे, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करत आहेत, तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात, सल्ला देतात, सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कुणाला पोटदुखी का होतेय, असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर मोदींनीही लक्ष घालावं, यामध्ये उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मोदींकडे हा प्रश्न घेऊन जावा, आम्ही त्यांच्या नेतृत्वात जाऊ. चंद्रकांत पाटलाचे सरकार राहिले नाही, तर त्यांना पण अभ्यास करता आला असता, असा टोलाही संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. मुळात महाराष्ट्राच्या प्रश्नावर राज्यपालांना भेटणे हा राज्याचा अपमान आहे. दुर्दैवाने आज जे आपल्या विचारांचे नाहीत, त्यांचा राजकारणात राहण्याचा अधिकार नाही, अशी मनोवृत्ती सध्या देशात तयार होतेय, बिहारच्या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागलंय, बिहार निवडणुकीत जर काही गडबड झाली नाही, तर तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर नवल वाटायला नको, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात जे तीन पक्षांचे सरकार आहे त्यापुढे फार मोठे आव्हान आहे. महाराष्ट्रात मजबूत विरोधी पक्ष आहे आणि चांगल्या विरोधी पक्षाचे स्वागत केलं पाहिजे. एक उत्तम विरोधी पक्ष राहिला पाहिजे. त्याशिवाय राज्य आणि देश पुढे जाऊ शकत नाही. मधला काळ हा संकटाचा होता, कोरोनाची लढाई उद्धव ठाकरे यांनी चांगली लढली. इतर राज्यांमध्ये व्यवस्था त्यांच्या खिजगणतीतही नव्हत्या. या मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विषयक संकटाशी लढताना स्वत: नेतृत्व केल्याचाही संजय राऊतांनी उल्लेख केला आहे. (Sanjay Raut On Bjp Hindutva)

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात; राऊतांचं सूचक विधान

ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा

(Sanjay Raut On Bjp Hindutva)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *