पंकजा मुंडे मतदानाला गैरहजर, कोणीही वेगळा अर्थ काढू नये; प्रीतम मुंडेंचं आवाहन

भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी गाडे पिंपळगाव येथे मतदानाचा अधिकार बजावला. Pankaja Munde Absent From Voting, No One Should Interpret Differently; Says Pritam Munde

  • महेंद्रकुमार मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड
  • Published On - 13:57 PM, 1 Dec 2020

बीड: तब्येत खराब असल्यानेच भाजप नेत्या पंकजा मुंडे मतदानाला गैरहजर आहेत, कोणीही याचा वेगळा अर्थ काढू नये, असं आवाहन भाजपच्या खासदार प्रीतम मुंडेंनी केलं आहे. भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी गाडे पिंपळगाव येथे मतदानाचा अधिकार बजावला. त्यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या. (Pankaja Munde Absent From Voting, No One Should Interpret Differently; Says Pritam Munde)

मतदारांचा प्रतिसाद पाहता कौल आमच्याच बाजूने लागेल, विजय आमचाच होईल, असा विश्वासही खासदार प्रीतम मुंडेंनी व्यक्त केला. पदवीधर मतदारसंघातील निवडणूक ही अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. कोरोनाच्या काळामध्ये मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो, याबद्दल शंका होती. मात्र मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे. गुलाल आमचाच असेल, असा विश्वास खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला, तर बंडखोर उमेदवार रमेश पोकळे यांनी निवडणूक लढल्यामुळे त्याचा निश्चितच परिणाम होईल, असे प्रीतम मुंडे म्हणाल्या.

विशेष म्हणजे राज्यातील विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांसाठी आज (1 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. मात्र या मतदानापूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे या आयसोलेट (विलगीकरण) झाल्या आहेत. त्यांनी रात्री उशिरा ट्विट करत कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यालाच आता भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी पूर्णविराम दिला आहे.

“पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की, आपण शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी, खोकला आणि ताप आहे. त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,” असे ट्विट पंकजा मुंडे यांनी काल (30 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास पोस्ट केले.

सतीश चव्हाण पदवीधर मतदारसंघात हॅट्ट्रिक साधतील- धनंजय मुंडे

विशेष म्हणजे धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी एकदाच केंद्रावर मतदान केलं आहे. सतीश चव्हाण पदवीधर मतदारसंघात हॅट्ट्रिक साधतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. त्यांनी आज परळी येथील गाढे पिंपळगाव येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सतीश चव्हाण यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त केला.

औरंगाबाद (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपचे मनसुबे यंदा धुळीस मिळण्याची शक्यता जास्त आहे. भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि थेट राष्ट्रवादीत सामील झाले. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.

औरंगाबादमध्ये कोणाकोणात लढत?

शिरीष बोराळकर (भाजप) vs प्रवीण घुगे (भाजप बंडखोर) vs रमेश पोकळे (भाजप बंडखोर) vs नागोराव पांचाळ (वंचित)

(Pankaja Munde Absent From Voting, No One Should Interpret Differently; Says Pritam Munde)

संबंधित बातम्या : 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस

पदवीधर निवडणूक : भाजपात डबल बंडखोरी, पंकजा समर्थकाचा उमेदवारी अर्ज, माजी जिल्हाध्यक्षाचाही बंडाचा झेंडा