पंकजा म्हणाल्या, पवारसाहेब हॅट्स ऑफ, रोहित पवार म्हणाले, ताई हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीही भाजपा नेत्या पंकजा मुंडेंवर स्तुतिसुमनं उधळली आहे.

पंकजा म्हणाल्या, पवारसाहेब हॅट्स ऑफ, रोहित पवार म्हणाले, ताई हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या काम करण्याच्या शैलीचं आणि तडफदारपणाचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कौतुक केलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीही भाजपा नेत्या पंकजा मुंडेंवर स्तुतिसुमनं उधळली आहे. (Rohit Pawar Praise On Pankaja Munde)

धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे, असं म्हणत रोहित पवारांनी पंकजा मुंडेंचं कौतुक केलं आहे. अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा, असंही ते म्हणाले आहेत.


ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. गेल्या दोन महिन्यांपासून ऊसतोड मजुरांच्या वाढीव दरवाढीचा प्रश्न गाजत होता. हा प्रश्न तूर्तास निकाली निघाला. त्यासाठी जयंत पाटील, शरद पवार, धनंजय मुंडे असे बरेच नेते उपस्थित होते.

पवारसाहेब हॅट्स ऑफ… आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले, असं ट्विट करत पंकजा यांनी शरद पवार यांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला होता. शरद पवार यांनी कोरोना संसर्गाच्या काळात राज्यातील अनेक शहरांना भेटी देऊन तेथील उपाययोजनांची पाहणी केली. याचाही उल्लेख करत कोरोनाच्या काळात इतका सगळा दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे, असंही पंकजा मुंडे सांगायला विसरल्या नाहीत. पवारांच्या कामाचं कौतुक करताना पक्ष आणि विचार वेगळे असतात, असं सांगताना त्यांनी मुंडे साहेबांच्या शिकवणाची पुष्टी जोडली.

ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच बैठकीवेळी पंकजा यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं.

संबंधित बातम्या

ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये ‘गोडवा’, पंकजा-धनंजय मुंडे 1 वर्षानंतर एकत्र

ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ, सर्व संघटनांचे एकमत, पुण्यातील बैठकीत निर्णय

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *