विधानसभा पोटनिवडणुकीवरुन आघाडीत बिघाडी, काँग्रेसचा झाला निर्णय?

महाविकास आघाडी असली तरी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. दोन दिवसांत उमेदवारांचे अर्ज माझ्याकडे दाखल होणार आहे. त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवून निर्णय घेण्यात येणार आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीवरुन आघाडीत बिघाडी, काँग्रेसचा झाला निर्णय?
निवडणुका जाहीर
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 1:47 PM

रणजित जाधव, पिंपरी चिंचवड : कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाची (assembly by election)निवडणूक बिनविरोध करावी, असा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजपविरोधात निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. त्याचवेळी पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या जागेवर दावा करत काँग्रेसही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू करा, असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यावरून पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी शनिवारी बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी देखील सहभाग घेतला. त्यांना अर्ज सादर करण्याचे सांगितले आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजित जाधव म्हणाले की, महाविकास आघाडी असली तरी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. दोन दिवसांत उमेदवारांचे अर्ज माझ्याकडे दाखल होणार आहे. त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवून निर्णय घेण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

कसबामध्ये भाजपचा उमेदवार कोण?

कसबा मतदार संघावर गेली तीन दशके भाजपचे वर्चस्व आहे. मुक्ता टिळक (mukta tilak) यांच्या निधनामुळे या मतदार संघात २७ फेब्रवारी रोजी निवडणूक होत आहे. भाजप टिळक परिवाराला उमेदवारी देणार का? चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरुड मतदार संघ सोडणाऱ्या मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देणार? हा निर्णय अजून झालेला नाही. परंतु टिळक परिवारात उमेदवारी देण्यात येणार असल्याचे भाजप  सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

एक-दोन दिवसात भाजप नेते देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहे. कोथरुडमध्ये उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज असलेल्या मेधा कुलकर्णी यांची नाराजी कायमच राहणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रूपाली पाटील-ठोंबरे हे इच्छुक आहेत. त्यांनी जाहीरपणे आपली इच्छा बोलून दाखवली. पक्षाने आदेश दिल्यास मीसुद्धा कसबा मतदार संघाची निवडणूक लढवण्यास तयार आहे. यामुळे पिंपरी चिंचवड व कसबा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाही.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.