पूजाच्या कुटुंबीयांकडून माझी हत्या होण्याची शक्यता, शांताबाई राठोड यांचा खळबळजनक आरोप

पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पूजाच्या कुटुंबीयांकडून माझी हत्या होण्याची भीती आहे, असा धक्कादायक आरोप केलाय.

  • महेंद्रकुमार मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड
  • Published On - 0:41 AM, 3 Mar 2021
पूजाच्या कुटुंबीयांकडून माझी हत्या होण्याची शक्यता, शांताबाई राठोड यांचा खळबळजनक आरोप
Shantabai Rathod

बीड: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे खुलासे समोर येत आहेत; भाजपच्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणावर आवाज उठवल्यानंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पूजाच्या कुटुंबीयांकडून माझी हत्या होण्याची भीती आहे, असा धक्कादायक आरोप केलाय. शांताबाई राठोड यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडालीय. (Possibility of my murder by Pooja chavan family, sensational allegation by Shantabai Rathod)

पैशामुळे माझी पूजाच्या कुटुंबाकडून हत्या होण्याची शक्यता

माझं नातं हे रक्ताचे आहे, पैशामुळे माझी पूजाच्या कुटुंबाकडून हत्या होण्याची शक्यता असल्याचा गंभीर आरोप पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केलाय. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पूजाच्या कुटुंबांवर शांताबाई राठोड यांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. यानंतर पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्या विरुद्ध परळी पोलिसात तक्रार दाखल केलीय.

माझ्याविरुद्ध तक्रार देण्यात आली हे चुकीचे, पूजाची आजी

माझ्याविरुद्ध तक्रार देण्यात आली हे चुकीचे आहे. मी सत्यासाठी लढत आहे. मी पुण्यात जाऊन पूजाला न्याय मिळावा म्हणून तक्रार दिली म्हणून याची झळ पूजाच्या कुटुंबाला लागल्याची खंत शांताबाई यांनी व्यक्त केली आहे. माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास पूजाला न्याय मिळवून देण्याची लढाई सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सुरू ठेवावी, असंही त्या म्हणाल्या.

शांताबाई राठोड यांचा नेमका आरोप काय?

“शिवसेना आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचं तोंड गप्प केलं आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत”, असा सनसनाटी आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड (Shanta Rathod) यांनी केला. पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत. संजय राठोड यांच्याकडून मिळालेले पैसे त्यांनी घरातील जमिनीत पुरुन ठेवले आहेत. यांच्या घरात जावयांमध्ये वाद सुरु आहेत. सध्या पूजाचे आई-वडील नव्हे तर त्यांना दिलेला पैसा बोलत आहे. या सगळ्याच्या माध्यमातून पूजाचे मृत्यूप्रकरण दडपण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजाला न्याय मिळवून द्यावा, ही माझी नम्र विनंती असल्याचे शांता राठोड यांनी सांगितले.

पूजाचे वडील काय म्हणाले?

पूजाचे वडील लहूदास चव्हाण (Lahu Chavan) यांनी 5 कोटी रुपये घेतल्याचे आरोप फेटाळले. पूजाच्या आई-वडिलांनी शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याकडून पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. याबाबत लहू चव्हाण म्हणाले, “कोण काय बोलतंय ते माहीत नाही. आम्ही आमच्या दुःखात आहे. इतकंच नाही तर शांताबाई या आमच्या नातेवाईक नाहीत”

संबंधित बातम्या

Pooja Chavan case | पूजा चव्हाण प्रकरणात नवा ट्विस्ट, वडिलांची चुलत आजीविरोधात पोलिसात तक्रार

Possibility of my murder by Pooja chavan family, sensational allegation by Shantabai Rathod