डिसले यांना मिळालेला पुरस्कार हा भारतीयांसाठी मान उंचावणारा आहे. Praveen Darekar Calls Fadnavis Directly From Disley Guruji House
उस्मानाबाद : 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर प्राईज पुरस्कार मिळालेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रणजितसिंह डिसले यांचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घरी जाऊन सहकुटुंब सत्कार केला आणि पेढे भरविले. (Praveen Darekar Calls Fadnavis Directly From Disley Guruji House)
डिसले यांना मिळालेला पुरस्कार हा भारतीयांसाठी मान उंचावणारा आहे. यावेळी दरेकर यांनी फोनवरून विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलणे करून दिले. यावेळी फडणवीस आणि पाटील यांनी डिसले यांना त्यांच्या कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.
आपल्या देशाचे हे दुर्दैव आहे की, शिक्षक मतदारसंघात शिक्षक नसलेला आमदार होतो, ज्यांच्यासाठी तो मतदारसंघ असतो तो नसतो. साहित्यिक, प्राध्यापक यासाठी मतदारसंघ असतात, मात्र दुर्दैवाने निवडणूक होतात, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने डिसले यांच्या आमदारपदासाठी शिफारस करणार असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
जिल्हा परिषदेचे शिक्षक अनेक अडचणींना सामोरे जात काम करीत आहेत, त्यांना डिसले हे प्रेरणादायी आहेत. डिसले यांना 7 कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला, यातून इतरांनी प्रेरणा घ्यावी आणि काम करावे, असेसुद्धा प्रवीण दरेकरांनी अधोरेखित केले आहे.
आपल्या देशाचे हे दुर्दैव आहे की, शिक्षक मतदारसंघात शिक्षक नसलेला आमदार होतो. ज्यांच्यासाठी तो मतदारसंघ असतो, तो नसतो. साहित्यिक प्राध्यापक यासाठी मतदारसंघ असतात, मात्र दुर्दैवाने निवडणूक होतात, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने डिसले यांच्या आमदारपदासाठी शिफारस करणार असल्याचे दरेकर म्हणाले.
युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टिचर प्राईझ जाहीर झाला असून सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार जाहीर झाला. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांतील 12 हजारहून शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डीसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे.
रणजितसिंह डिसले यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संपूर्ण महाष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी पुरस्कारातील एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम त्यांच्यासोबत नामांकन मिळालेल्या पहिल्या 9 शिक्षकांना देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या 9 शिक्षकांचादेखील सन्मान होणार आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे. दरम्यान, रणजितसिंह डिसले यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे. तसेच, हा राज्यातील सर्व शिक्षकांचा गौरव असल्याची भावना रणजितसिंह यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या
अरे व्वा..! जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची युनेस्कोकडून दखल, तब्बल 7 कोटी रुपयांच्या पुरस्काराने सन्मान
जिल्हा परिषदांच्या शाळांना नावे ठेवणाऱ्यांना डिसले गुरुजी हेच उत्तर : दत्तात्रय भरणे