सुडाचे उत्तर सुडाने देऊ म्हणणं म्हणजे संविधानाचा अपमान; प्रवीण दरेकरांचा पलटवार

सुडाचे उत्तर सुडाने देऊ, असं म्हणणं म्हणजे संविधानाचा अपमान केल्या सारख होईल. (Pravin Darekar Thackeray Government)

  • सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 11:34 AM, 26 Nov 2020

नागपूरः आम्हाला सरकार पडण्याची घाई नाही. राजकारणात प्रत्येक जण लढणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे सुडाचा बदला सुडाने घेतला जातो. मात्र सुडाला सुडाने उत्तर नाही, तर वैचारिक उत्तर दिलं पाहिजे, असं म्हणत भाजप आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी ठाकरे सरकारवर पलटवार केला. ते नागपुरात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. (Pravin Darekar Counterattack On Thackeray Government)

एखादी कारवाई झाली तर त्यावर चर्चा होऊ शकते. आज संविधान दिवस (Constitution Day) आहे, संविधानाने प्रत्येकाचा हक्क सुरक्षित केला आहे. सुडाचे उत्तर सुडाने देऊ, असं म्हणणं म्हणजे संविधानाचा अपमान केल्यासारखं होईल, सामना हा त्यांचा आहे, त्यात ते आपले विचार मांडू शकतात. सरकार पडण्यासंदर्भात आमच्या पक्षाने भूमिका स्पष्ट केल्याचंही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संविधान दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. नागपूरच्या संविधान चौकातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. संविधानाने भारतातील प्रत्येक व्यक्तीला हक्क दिला आहे. बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं असून, हा दिवस सगळ्या भारतीयांसाठी महत्त्वाची असल्याची भावना व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद आहे, त्यामुळे त्यांना सरकार पडण्याची भीती वाटते. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात प्रचंड आक्रोश आहे म्हणून ते भयाने पछाडले आहेत, अशी टीकासुद्धा त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असं नाव देण्यात आलं आहे. या मुलाखतीचा प्रोमो नुकतंच प्रदर्शित करण्यात आला. यात राज्यातील कोरोना स्थिती, भाजपाकडून होणारी टीका,  सरकारसमोरील आव्हान याबाबतची भाष्य करण्यात आलं आहे. नुकत्यात प्रदर्शित झालेल्या अभिनंदन मुलाखतीच्या प्रोमोमध्ये भाजपला रोखठोक इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ही मुलाखत चांगलीच गाजणार असल्याचे दिसत आहे.

27 नोव्हेंबरला ही मुलाखत प्रसिद्ध होणार

दरम्यान संजय राऊत यांनी यापूर्वीही उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली होती. त्यानंतर आता महाविकासआघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्तची त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली आहे. सामना या वृत्तपत्रातून ही मुलाखत प्रसिद्ध केली जाणार आहे. उद्या म्हणजेच (27 नोव्हेंबर) ही मुलाखत प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे या मुलाखतीतून मुख्यमंत्री कोणकोणते गौप्यस्फोट करतात, कोणत्या विषयावर भाष्य करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

रोहित पवारांना बळ, पार्थ पवारांना डावललं, पवार कुटुंबात सारं काही अलबेल नाही?; ‘या’ पुस्तकातील खळबळजनक दावे

EXCLUSIVE : फडणवीस म्हणाले, तुमच्यासोबत कोण, दादा म्हणाले धनंजय मुंडे, सुनील शेळके, संदीप क्षीरसागरसह 28 जण!