EXCLUSIVE : फडणवीस म्हणाले, तुमच्यासोबत कोण, दादा म्हणाले धनंजय मुंडे, सुनील शेळके, संदीप क्षीरसागरसह 28 जण!

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबाबत पुस्तकात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. (Devendra Fadnavis Ajit Pawar)

  • दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 16:20 PM, 25 Nov 2020
Devendra Fadnavis – Ajit Pawar

मुंबई : महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार (Devendra Fadnavis – Ajit Pawar) यांच्या शपथविधीची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. या शपथविधीला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र लेखिका प्रियम गांधी यांच्या पुस्तकात (Priyam Gandhi mody book trading power) फडणवीसांचे प्रश्न आणि अजित पवारांची उत्तर जशीच्या तशी छापली आहेत. या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे केले आहेत. (Priyam Gandhi Mody Book Trading Power Revels Inside Story Of Devendra Fadnavis Ajit Pawar Talks)

प्रियम गांधी यांच्या ट्रेडिंग पॉवर या पुस्तकातील मजकुरानुसार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपबरोबर सरकार बनवू इच्छित होते. त्यासाठी अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक मोठा नेता उपस्थित होता. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जी मध्यस्थी करायची होती, त्यासाठी जी कार्यवाही होती, ती हा मोठा नेता पार पाडत होता. सत्ता स्थापनेच्या सूत्राबद्दलही या बैठकीत निश्चित धोरण ठरलं होतं, असा दावाही प्रियम गांधी यांच्या ट्रेडिंग पॉवर या पुस्तकात करण्यात आला आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेले संभाषण प्रियम गांधी मोदी यांनी पुस्तकात छापलं आहे.

‘ अजितदादा कोण आहेत ते आमदार ?’ फडणवीसांनी प्रश्न विचारला

‘सुनील शेळके, संदीप क्षीरसागर, राजेंद्र शिंगणे, सुनील भुसारा, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील टिंगरे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार, अनिल पाटील–शिवाय तेरा आणखी,’ अशी आपल्याकडच्या आमदारांची यादीच अजित पवार यांनी मोठ्या आत्मविश्वासाने वाचून दाखवली. (Priyam Gandhi Mody Book Trading Power Revels Inside Story Of Devendra Fadnavis Ajit Pawar Talks)

‘या आमदारांना राज्याच्या बाहेर घेऊन जावं, असं तुम्हांला वाटतं काय? ते बाहेर सुरक्षित राहतील,’ फडणवीस म्हणाले.

‘नाही, नाही. इथेच थांबू या. इतर आमदारांबरोबर राहिले तर कदाचित ते इतरांचं मनपरिवर्तन करू शकतील. यासाठी व्यूहरचना करावी लागेल. मी माझ्या विश्वासू सहकाऱ्यांशी याविषयी बोलतो. चार आमदारांचा एक गट करू. माझ्या विश्वासातले 28 आमदार ग्रुप लीडर म्हणून काम करतील. उरलेल्या एक-एक दोन आमदारांशी बोलून त्यांचं मन वळवण्याचं काम या 28 आमदारांवर सोपवलं जाईल,’ अजित पवार म्हणाले.
‘हूं…दादा, सगळं चोख पार पडलं पाहिजे. आपण फार मोठी जोखीम पत्करतो आहोत हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. होय ना ?’ फडणवीस म्हणाले आहेत.

एकंदरीत या पुस्तकातील काही भाग समोर आल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रियम गांधी मोदी यांचं ट्रेडिंग बुक 28 नोव्हेंबरला वाचकांच्या भेटीला येणार आहे. 23 नोव्हेंबर 2019ला देवेंद्र फडणवीस-अजित पवार (Devendra Fadnavis – Ajit Pawar) यांच्या शपथविधीची इनसाईड स्टोरी घडली होती. त्यानंतर 28 नोव्हेंबर 2019ला उद्धव ठाकरेंचा शपथविधी झाला होता. आता 28 नोव्हेंबरच्या मुहूर्तावरच ट्रेडिंग पॉवर हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.

संबंधित बातम्या 

EXCLUSIVE : पहाटेच्या शपथेची इनसाईड स्टोरी, फडणवीस म्हणाले, दादा जोखीम पत्करतोय, दादा म्हणाले माझ्यासोबत 28 आमदार

PHOTO : 80 तासांच्या सरकारची वर्षपूर्ती; ‘त्या’ ऐतिहासिक दिवसाचे फोटो 

(Priyam Gandhi Mody Book Trading Power Revels Inside Story Of Devendra Fadnavis Ajit Pawar Talks)