Raj Thackeray : मुंब्रा इथे अनधिकृत भोंगे वाजल्यास राडा, मनसेचा इशारा; पहाटेपासूनच हनुमान चालिसाचे सूर घुमणार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पालन न करता मुंब्र्यातील मस्जिदवरील भोंगा वाजला तर सकाळी 5 वाजण्याच्या शुभ मुहूर्तावर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवण्यात येईल, असा इशारा ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

Raj Thackeray : मुंब्रा इथे अनधिकृत भोंगे वाजल्यास राडा, मनसेचा इशारा; पहाटेपासूनच हनुमान चालिसाचे सूर घुमणार
अविनाश जाधव, मनसे, ठाणे
Image Credit source: TV9
गणेश थोरात

| Edited By: सागर जोशी

May 03, 2022 | 7:55 PM

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगाबादेतील सभेत राज ठाकरे यांनी भडकाऊ भाषण केल्यामुळे त्यांच्याविरोधात औरंगाबादच्या (Aurangabad) सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकंच नाही तर राज्यभरातील मनसे नेत्यांना नोटीस बजावण्यात येत आहे. अशावेळी ठाण्यातील मनसे पदाधिकारी अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेंटमनंतर मुंब्र्यातील मशिदिवरील भोंगे पोलिसांनी उतरवले नाहीत आणि अनधिकृतपणे सकाळची बांग सुरू झाली, तर मनसेचे कार्यकर्ते मुंब्र्यात धडकणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पालन न करता मुंब्र्यातील मस्जिदवरील भोंगा वाजला तर सकाळी 5 वाजण्याच्या शुभ मुहूर्तावर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाजवण्यात येईल’, असा इशारा ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

‘..तर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणारच’

लाऊडस्पीकर हा विषय धार्मिक नसुन सामाजिक आहे. सामाजिक समस्या म्हणूनच त्याकडे पाहिले पाहिजे, बऱ्याच वर्षांपासून हा विषय सुटता सूटत नाही. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाचे पालन आम्ही नक्की करणार, असल्याचं जाधव यांनी यावेळी स्पष्ट केलं. मशिदीवरील भोंगे पोलिसांनी काढले नाहीत. तर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणारच, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार केला आहे. तसेच, भोंगा उतरवला नाही तर मुंब्रा येथील मशिदी बाहेर संघर्ष करणार, असं आव्हान अविनाश जाधव यांनी दिल्याने ठाण्यात भोंग्यांचा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन होणार

ईद सणामध्ये व्यत्यय नको म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे ऐवजी 4 मे पासुन भोंगे उतरलेच पाहिजेत, असा आग्रह धरला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहुन शासनानेच ही कार्यवाही करणे गरजेचे आहे. तरीही या विषयाला नाहक धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो हे दुर्दैवी असल्याचे मत अविनाश जाधव यांनी व्यक्त केले आहे. तेव्हा, भोंगे उतरले नाही तर, राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करण्यासाठी महाराष्ट्र सैनिक सज्ज असल्याचे जाधव यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें