Raj Thackeray : बृजभूषण सिंहांनंतर आता साक्षी महाराजही म्हणतात, ‘राज ठाकरे माफी मागा…’ तेही थेट नाशिकमधून!

भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांनी माफी मागावी आणि मगच अयोध्येत पाय ठेवावा, अशी आक्रमक भूमिका घेतली. बृजभूषण सिंह यांच्यानंतर आता भाजपचे उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनीही राज ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी केली. महत्वाची बाब म्हणजे साक्षी महाराज यांनी ही मागणी नाशिकमध्ये केलीय.

Raj Thackeray : बृजभूषण सिंहांनंतर आता साक्षी महाराजही म्हणतात, 'राज ठाकरे माफी मागा...' तेही थेट नाशिकमधून!
साक्षी महाराज, राज ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 10:59 PM

नाशिक : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर राज यांनीही आपला 5 तारखेचा दौरा रद्द केला. रेल्वे भरतीच्या (Railway Recruitment) मुद्द्यावरुन महाराष्ट्रात उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेल्या उमेदवारांना मनसे नेते आणि कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती आणि त्यांना महाराष्ट्रातून बाहेर काढलं होतं. त्याच मुद्द्यावरुन भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी राज ठाकरे यांनी माफी मागावी आणि मगच अयोध्येत पाय ठेवावा, अशी आक्रमक भूमिका घेतली. बृजभूषण सिंह यांच्यानंतर आता भाजपचे उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनीही राज ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी केली. महत्वाची बाब म्हणजे साक्षी महाराज यांनी ही मागणी नाशिकमध्ये केलीय.

‘अयोध्यावासियांची अपेक्षा आहे की राज ठाकरे यांनी माफी मागावी’

साक्षी महाराज म्हणाले की, विरोध करणारे, विरोध करत आहेत. स्वागत करणारे, स्वागत करत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्दल केलेलं वक्तव्य चुकीचंच आहे. अटक पासून कटकपर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व देश एक आहे. सगळ्यांना सगळ्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. अयोध्यावासियांची एवढीच अपेक्षा आहे की राज ठाकरे यांनी माफी मागावी आणि दर्शनाला यावं. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत केलेलं वक्तव्य चुकीचंच आहे. मुंबईत येणाऱ्या उत्तर भारतीयांबाबत तुम्ही कसं बोलू शकता? असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय.

‘काशीमध्येही नंदीची तपश्चर्या सफल झाल्याचं वाटतं’

ज्ञानवापीवर बोलताना साक्षी महाराज म्हणाले की, काहीजण ज्ञानवापीच्या मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. काय खरं आणि काय खोटं आहे हे समोर आलं पाहिजे. अशा मताचं आमचं सरकार आहे. सत्य तुम्ही फार काळ लपवू शकत नाही. पूर्ण जगात ज्या ठिकाणी शिवाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी नंदीचे तोंड शिवलिंगाकडे असते. त्यामुळे काशीमध्येही नंदीची तपश्चर्या सफल झाल्याचं वाटत आहे. मुस्लिम धर्मगुरुंनीही सांगितलं आहे की आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करु, हे सगळ्यांच्या हिताचंही आहे, असं साक्षी महाराज म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा रद्द

दरम्यान, बृजभूषण सिंह यांनी जोरदार विरोध केल्यानंतर राज ठाकरे यांनी अखेर आपला अयोध्या दौरा रद्द केल्याचं जाहीर केलंय. पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी बृजभूषण सिंह यांना दिल्ली आणि महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा आरोप केला. अयोध्या दौरा रद्द काही लोकांना वाईट वाटलं काहींना आनंद झाला. काही लोक कुत्सित बोलत होते. त्यामुळे दोन दिवसांचा मुद्दाम बफर दिला. काय बोलयाचं ते बोला. मग मी माझी भूमिका महाराष्ट्र आणि देशाला सांगेल. ज्या दिवशी लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली. त्यानंतर पुण्यात मी अयोध्येला जाणार याची तारीख जाहीर केली. त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. अयोध्येला येऊ देणार नाही. मला मुंबईतून माहीत मिळत होती. दिल्लीतून माहिती मिळत होती. उत्तर प्रदेशातून माहिती मिळत होती. नेमकं काय चाललंय. त्यानंतर लक्षात आलं हा ट्रॅप आहे. या सापळ्यात आपण आडकलं नाही पाहिजे. यासाठी रसद पुरवली गेली. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. त्या सर्वांनी मिळून आराखडा आखला, असा दावा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.