राजन साळवी घेणार आज उद्धव ठाकरेंची भेट, भेटीमध्ये नेमकी चर्चा कशावर?

राजकीय वर्तृळातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी हे आज उद्धव  ठाकरेंची भेट घेणार आहेत.

राजन साळवी घेणार आज उद्धव ठाकरेंची भेट, भेटीमध्ये नेमकी चर्चा कशावर?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 10:29 AM

मुंबई  : राजकीय वर्तृळातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी (Rajan Salvi) हे आज उद्धव  ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेणार आहेत. सोमवारी राज्यातील विविध ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठं यश मिळालं आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर मतदारसंघात ठाकरे गटाने अनेक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्या या भेटीदरम्यान इतर देखील काही विषयांवर चर्चा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रत्नागिरीत ठाकरे गटाला यश

सोमवारी राज्यातील विविध ग्रामपंचायतींचे निकाल लागले. यामध्ये ठाकरे गटाला चांगले यश मिळाले आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर मतदारसंघात ठाकरे गटाने अनेक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला. हा शिंदे गट आणि मंत्री उदय सामंत यांच्यासाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. ठाकरे गटाने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मिळवलेल्या यशानंतर आता राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांची आज भेट घेणार आहेत.

हे सुद्धा वाचा

राजन साळवी सामंत यांना आव्हान देणार?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले. शिवसेनेतील अनेक महत्त्वाचे नेते शिंदे गटात गेल्यानं उद्धव ठाकरे गटात पोकळी निर्माण झाली. मात्र आता ही पोकळी भरून काढण्याचा जोरदार प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू आहे. उदय सांमत यांच्याविरोधात विधानसभेला राजन साळवी यांना शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.