Ramdas Kadam | अनिल परब तुझ्या बापाचा पैसा आहे का? तू निधी न देणारा कोण?, रामदास कदम यांनी दिला ‘हा’ इशारा

वांद्रेमधून अनिल परब यांनी विधानसभेची किंवा नगरपालिकेची निवडणूक लढवून जिंकून दाखवावी, असं खुलं आव्हान रामदासस कदमांनी दिलंय. मंत्रिपद मिळाल्यानंतर अनिल परब हे शिवसेनेच्या मुळावर उठलेत, असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केलाय.

Ramdas Kadam | अनिल परब तुझ्या बापाचा पैसा आहे का? तू निधी न देणारा कोण?, रामदास कदम यांनी दिला 'हा' इशारा
रामदास कदम
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 1:34 PM

मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) अंतर्गत वादाला चव्हाट्यावर आणणारी मोठी घडामोड आज समोर आली. शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी परिवहन मंत्री अनिल परबांवर (Anil Parab) गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल चढवलाय. अनिल परब तुझ्या बापाचा पैसा आहे का? तू निधी न देणारा कोण? असं म्हणत रामदास कदम यांनी अनिल परबांना डिवचलंय. अनिल परबांनी आपल्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत आपलं आणि आपल्या मुलाचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट घातल्याचा घणाघाती आरोप रामदास कदम यांनी केलाय. मुंबईत (Mumbai) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोस्टर, ऑडिओ (Audio) या सगळ्याचा हवाला देत अनिल परबांविरोधात रामदास कदम यांनी सडकून टीका केली आहे.

कदमाचं परबांना ओपन चॅलेंज!

वांद्रेमधून अनिल परब यांनी विधानसभेची किंवा नगरपालिकेची निवडणूक लढवून जिंकून दाखवावी, असं खुलं आव्हान रामदासस कदमांनी दिलंय. मंत्रिपद मिळाल्यानंतर अनिल परब हे शिवसेनेच्या मुळावर उठलेत, असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केलाय. दोन वर्षात माझ्या मुलाचा त्यांनी एकदाही फोन घेतला नाही, असा दावा त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केलाय. संजय कदमशी सातत्यानं अनिल परबांनी संबंध ठेवल्याचंही त्यांनी म्हटलंय. वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना नेहमी पाठीशी घालण्याचं काम अनिल परबांनी केलं. अनिल परब हे कदम आणि खेडेकरांचे महात्मा गांधी आहेत, असं म्हणज रामदास कदमांनी पोस्टरही पत्रकार परिषदेत दाखवले. याबाबत आपण सुभाष देसाई आणि अनिल देसाईंनाही सांगितल्याची माहिती रामदास कदमांनी यावेळी दिली.

कदमांना संपवण्याचा डाव?

दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्य निवडणुका आता होणार आहे. योगेश कदम आमदार आहेत. त्यांनी या निवडणुकीसाठी उमेदवार पाहिले आणि कुणाला संधी मिळावी, याबाबत पक्षाला कळवलं होतं. पण भगवा झेंडा पायाखाली तुडवणाऱ्या संजय कदमला अनिल परबांनी सोबत दिली. शिवसेनेविरोधात काम करणाऱ्या संजय कदमला गाडून आम्ही जिथं भगवा फडकवला, त्याला सोबत करणारा अनिल परब निष्ठावान कसा? असा सवालही रामदास कदमांनी उपस्थित केलाय.

परबांची बाडग्यांना साथ!

बाडग्यांना परब यांनी पदं दिली. उद्धव ठाकरेंना त्याची माहिती नसेल. योगेश कदम यांनी याबाबत आदित्य ठाकरेंनाही कल्पना दिली आहे. सुनील तटकरेंच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न अनिल परबांनी चालवला असल्याची टीका रामदास कदमांनी केली आहे.

परब यांनी एक मीटिंग बोलावली होती. या मिटिंगला तटकरे आणि सूर्यकांत दळवी होते. पाच वर्ष या सूर्यकांत दळवीने संजय कदमच्या खांद्याला खांदा लावून माझ्या मुलाविरोधात काम केलं. ज्यांच्याविरोधात लढून आम्ही पक्ष उभा केला, तीच लोकं आज आमच्या विरोधात उभी असून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप रामदास कदमांनी केलाय. शिवसनेची पाच वर्ष सत्ता असूनही अडीच वर्ष राष्ट्रवादीला नगराध्यक्ष पद देणारा अनिल परब गद्दार आहे, असं म्हणत रामदास कदमांना तोफ डागली आहे.

पाहा संपूर्ण व्हिडीओ UNCUT – 

महत्त्वाच्या बातम्या –

अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडला, त्याना तालुका प्रमुखही माहीत नाही; रामदास कदम यांचा थेट हल्ला

कदमांचे 5 वार; शिवसेना संपवण्याची हरामखोरी मंत्र्यांकडून सुरू, उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कारवाईची मागणी

‘विटंबना छोटी गोष्ट! ‘छत्रपतींच्या पुतळ्यावरील वादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचं धक्कादायक विधान

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.