भाजपमध्ये काहीही होऊ शकतं, आम्ही अख्खं मंत्रिमंडळ बदलून टाकलं, रावसाहेब दानवेंचं विधान

रावसाहेब दानवे यांच्या विधानाची जोरदार चर्चा होतेय...

भाजपमध्ये काहीही होऊ शकतं, आम्ही अख्खं मंत्रिमंडळ बदलून टाकलं, रावसाहेब दानवेंचं विधान
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 3:26 PM

औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी एक विधान केलंय. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा होतेय. भाजपमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. गुजरातमध्ये आम्ही सगळं मंत्रिमंडळ (Gujrat Cabinet) बदलून टाकलं, असं दानवे म्हणालेत. आमच्या वरिष्ठ नेत्यांचा आम्हाला धाक आहे. सरकारी काम दिलं तर तेच आम्हाला करावं लागतं, असंही दानवे (Raosaheb Danave) म्हणालेत.

उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही त्यांना धोका दिला. पण भाजप-सेनेला जनतेने बहुमत दिलं होतं. पण आपल्याशिवाय सरकार होऊ शकत नाही हे लक्षात आलं आणि त्यांनी आम्हाला धोका दिला. काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केलं. हा धोका आम्हाला नव्हता जनतेला होता.पण ही खदखद आमदारांच्या मनात खदखद होती. त्यांनी पुन्हा आपलं सरकार आणलं पण मुख्यमंत्री आपला झाला नाही. राजकारणात बहुमताला घेऊन चालावं लागतं, असं दानवे म्हणाले.

मी लोकसभा निवडणुकीत आजारी पडलो. मला अजिबात चिंता वाटली नाही मी पडेन का? कारण कार्यकर्ते पाठीशी होते. मी आजारी असून लोकांनी मला निवडून दिलं. यावर अर्जुन खोतकर बबनराव लोणीकरांना म्हणाले की, रावसाहेब लई सिरीयस आहे. असं समजून लोकांनी निवडून दिलं पण आपण जर आजारी पडलो तर कशाला मत वाया घालायचं म्हणून लोकांनी आपल्याला निवडून दिलं नसतं, असंही दानवे म्हणालेत.

भाजपचा कार्यकर्ता नरेंद्र मोदींच्या नावानेच निवडणून येतो, असं दानवे म्हणाले. त्याचा पुरावाही त्यांनी दिला. नरेंद्र मोदी बाहेर परदेशी दौऱ्यांवर असतात. अशावेळी निवडूक कसं येणार? असं उत्तर प्रदेशातल्या एका मंत्र्याने विचारलं. त्यावर मोदी म्हणाले की तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला निवडणून आणतो. मतं थोडीच तुमच्या नावावर पडतात, असा किस्सा दानवेंनी सांगितला. शिवाय आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावरच निवडून येतो, असं आपल्या कार्यकर्त्यांना दानवेंनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.