मोदींच्या मंत्र्याच्या प्रवासावर तब्बल 393 कोटी खर्च : आरटीआय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी गेल्या पाच वर्षात परदेश आणि देशातंर्गत प्रवासासाठी 393 कोटी रुपये खर्च केले आहेत. अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना कॅबिनेट अफेअर्सच्या वेतन आणि खाते विभागाने दिली. यामध्ये सर्वाधिक खर्च परदेश दौऱ्यावर झाला आहे. परदेश दौऱ्यावर 292 कोटी, तर देशातंर्गत प्रवासावर 110 कोटी रुपये खर्च […]

मोदींच्या मंत्र्याच्या प्रवासावर तब्बल 393 कोटी खर्च : आरटीआय
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी गेल्या पाच वर्षात परदेश आणि देशातंर्गत प्रवासासाठी 393 कोटी रुपये खर्च केले आहेत. अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना कॅबिनेट अफेअर्सच्या वेतन आणि खाते विभागाने दिली. यामध्ये सर्वाधिक खर्च परदेश दौऱ्यावर झाला आहे. परदेश दौऱ्यावर 292 कोटी, तर देशातंर्गत प्रवासावर 110 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधानासह सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी गेल्या 5 वर्षात परदेश आणि देशातंर्गत प्रवासांवर झालेल्या एकूण खर्चाची माहिती मागितली होती. कॅबिनेट अफेअर्सच्या वेतन आणि खाते विभागाचे वरिष्ठ लेखा अधिकारी सतीश गोयल यांनी अनिल गलगली यांना ई-लेखाच्या आधारावर त्या कार्यालयाच्या अभिलेखावर उपलब्ध वर्ष 2014- 2015 पासून वर्ष 2018-2019 या 5 वर्षात परदेशी आणि देशातंर्गत प्रवासांवर झालेल्या एकूण खर्चाची आकडेवारी दिली.

यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख नाही. गेल्या 5 वर्षात कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर एकूण 262 कोटी 83 लाख 10 हजार 685 रुपये खर्च करण्यात आले, तर  देशातंर्गत प्रवासांवर एकूण 48 कोटी 53 लाख 9 हजार 584 रुपये खर्च झाले आहेत. राज्यमंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर 29 कोटी 12 लाख 5 हजार 170 रुपये खर्च करण्यात आले, तर देशातंर्गत प्रवासांवर  53 कोटी 9 लाख 26 हजार 451 रुपये खर्च झाले आहेत.

प्रत्येकवर्षी परदेश आणि देशातंर्गत प्रवासावरील खर्च

वर्ष 2014-15

कॅबिनेट मंत्री – 98 कोटी 48 लाख 62 हजार 352 रुपये

राज्यमंत्री – 11 कोटी  28 लाख 81 हजार 439 रुपये

वर्ष 2015-16

कॅबिनेट मंत्री – 84 कोटी 99 लाख 87 हजार 624 रुपये

राज्यमंत्री – 13 कोटी 17 लाख 41 हजार 407 रुपये

वर्ष 2016-17

कॅबिनेट मंत्री – 45 कोटी 51 लाख 72 हजार 825 रुपये

राज्यमंत्री – 12 कोटी 11 लाख 21 हजार 832 रुपये

वर्ष 2017-18

कॅबिनेट मंत्री – 33 कोटी 85 लाख 97 हजार 483 रुपये

राज्यमंत्री – 17 कोटी 79 लाख 87 हजार 199 रुपये

वर्ष 2018-19

कॅबिनेट मंत्री – 48 कोटी 49 लाख 99 हजार 985 रुपये

राज्यमंत्री – 27 कोटी 83 लाख 99 हजार 744 रुपये

Non Stop LIVE Update
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....