सावरकर हे आमचे हिंदुत्वाचे मार्गदर्शकच; शिवसेना कधीही गप्प बसणार नाही : संजय राऊत

जे आम्हाला प्रश्न विचारत आहेत त्यांनी समजून घ्यावे की शिवसेनेने ही पहिली मागणी केली आहे. त्यांनी इतिहास चाळून पाहावा, असा टोलाही संजय राऊतांनी भाजपाला लगावला आहे.

सावरकर हे आमचे हिंदुत्वाचे मार्गदर्शकच; शिवसेना कधीही गप्प बसणार नाही : संजय राऊत

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे हिंदुत्वाचे नेहमी मार्गदर्शकच राहिले आहेत. वीर सावरकर विषयाबाबत शिवसेना कधीही गप्प बसणार नाही, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. सावरकर यांना भारतरत्न द्यावं, ही मागणी आम्ही पहिली केली होती. जे आम्हाला प्रश्न विचारत आहेत त्यांनी समजून घ्यावे की शिवसेनेने ही पहिली मागणी केली आहे. त्यांनी इतिहास चाळून पाहावा, असा टोलाही संजय राऊतांनी भाजपाला लगावला आहे. (sanjay raut on bjp Veer Savarkar issue)

कोणत्या अडचणी आहेत हे ज्यांना आता पुळका आला आहे, त्यांनी सांगावं. मंदिरं खुली करा हा मुद्दा घेऊन कोणीही राजकारण करू नका, असं खुद्द मोहन भागवत यांनीसुद्धा सांगितलं आहे. देशावर संकट अजून वाढण्यासाठी हे सर्व केलं जातं असल्याची टीकासुद्धा त्यांनी भाजपावर केली आहे.

तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचे पाठ स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहातून देशाला सांगितले. मात्र, आमचा प्रश्न एकच आहे, काँग्रेस नेते सावरकरांसंदर्भात अपमानकारक भाषा बोलत होते, त्यावेळी शिवसेना गप्प का होती?”, असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उपस्थित केला होता. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरले होते. त्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा समाचार घेतला आहे. “ज्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी विरोधकांसमोर गुडघे टेकले; त्यांनी हिंदू मंदिरं, घंटा, हिंदू धर्म, हिंदू पूजा पद्धती, आरतीची चेष्टा करू नये”, असं टोलाही किरीट सोमय्यांनी लगावला होता.

संबंधित बातम्या : 

काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या; उद्धव ठाकरेंचा हल्ला

मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी असेल तर हे मोदींचच अपयश; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना न्याय देईन, मुख्यमंत्री म्हणून वचन : उद्धव ठाकरे

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *