धनंजय मुंडेंवर बलात्काराचा गंभीर आरोप; पवारांचीही ठाम भूमिका; राजकीय कारकिर्दीचं नेमकं काय होणार?

आता धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्दच धोक्यात आलीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:07 PM, 14 Jan 2021
Mumbai police may call Dhananjay Munde for probe after Renu Sharma Rape accusations
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पोलिसांची भेट घेतली. यानंतर आता पोलिसांकडून धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.

मुंबईः स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं बोट धरून राजकारणात आलेले धनंजय मुंडेंनी राजकारणातही स्वतःला सिद्ध करून दाखवलं. संघर्ष, अमोघ वक्तृत्व आणि कुशल संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी राजकारणात चांगला दबदबा निर्माण केला. राजकारणात खऱ्या अर्थानं ते मोठे होत असतानाच त्यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप झाले. त्यामुळे आता धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्दच धोक्यात आलीय. (Serious Allegations Of Rape Against Dhananjay Munde; Pawar Strong Role; What Happen To The Political Career?)

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केल्यानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. 2006 पासून धनंजय मुंडे यांनी आपलं शारीरिक शोषण केल्याचं रेणू यांनी म्हटलंय. 2006 पासून हा प्रकार सुरू होता तर गेली 14 वर्षं त्या गप्प का होत्या? आताच त्यांनी हे बिंग का फोडलं? यामागे काही कारणं आहेत का? असे प्रश्नही या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळे 2006 मधील प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्द

1995 च्या विधानसभा निवडणुकीपासून काका गोपीनाथ मुंडे यांचा हात पकडून धनंजय मुंडे राजकारणात आले. सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यांनी बेरोजगारांच्या सभा, मोर्चे काढून रान उठवलं होतं. 9 ऑगस्ट 2008 रोजी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दिल्ली येथे झालेल्या युवा क्रांती रॅलीत 15 हजार युवकांचे नेतृत्व त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी मार्च 2009 मध्ये युवकांच्या प्रश्नांसंदर्भात पुणे येथे राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करून युवकांच्या हक्काची सनद प्रसिद्ध केली.

धनंजय मुंडेंची जिल्हा परिषद सदस्यापासून राजकारणाला सुरुवात

जून 2010 मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची प्रथम निवड झाली. धनंजय मुंडेंची जिल्हा परिषद सदस्यापासून राजकारणाला सुरुवात झाली. पुढे त्यांनी भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षापर्यंत गरुडझेप घेतली. मात्र कौटुंबिक वादातून गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे बंधू पंडितअण्णा मुंडे यांच्यात राजकीय वाद शिगेला पोहोचला. आपला मुलगा धनंजय यांना आमदार करावं, अशी इच्छा पंडितअण्णा मुंडे यांची होती. घरातच कलह निर्माण झाल्यामुळे पंडितअण्णा यांनी गोपीनाथ मुंडे यांना सोडचिठ्ठी देत हे राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, सतत राजकीय उपेक्षा वाट्याला आल्याने त्यांनी अखेर 2011मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर मुंडे विरुद्ध मुंडे असंच समीकरण बीडच्या राजकारणात तयार झाले.

2011 साली धनंजय मुंडे यांचादेखील राष्ट्रवादीत प्रवेश

2011 साली धनंजय मुंडे यांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करून एक नव्या राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून 2013मध्ये विधान परिषदेवर गेले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सभागृह गाजवलं. त्यांच्या वक्तृत्वाने त्यांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं. त्यानंतर ते 2019 मध्ये विधानसभेवर निवडून आले. 2019 च्या निवडणुकीत आमदार म्हणून विजयी झाले, त्यानंतर घवघवीत यश मिळवून ते राज्याच्या मंत्रिमंडळात आले. त्यांच्याकडे सामाजिक न्यायमंत्रिपदाची सूत्रे सोपवण्यात आली. धनंजय मुंडे हे 1995 पासून राजकारणात आहेत. या आरोपांमुळे त्यांच्या 25 वर्षांच्या राजकारणाच्या कारकिर्दीला ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकारणात अनेक चढउतार पाहिल्यानंतर एवढा मोठा आरोप झाल्याने मुंडेंच्या राजकारणाचं काय होणार? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

संबंधित बातम्या

सरकार टिकवायचं की नाही हे उद्धव ठाकरेंनी ठरवावं : प्रकाश आंबेडकर

“धनंजय मुंडेंवर आरोप झाले, मग काय त्यांना फासावर चढवायचं का?”

Serious Allegations Of Rape Against Dhananjay Munde; Pawar Strong Role; What Happen To The Political Career?