धनंजय मुंडेंवरच्या बलात्काराच्या आरोपांवर शरद पवार म्हणतात…

धनंजय मुंडेंप्रकरणी वाटल्यास चौकशी होऊ द्या. सत्य बाहेर येऊ द्या.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:56 PM, 20 Jan 2021
धनंजय मुंडेंवरच्या बलात्काराच्या आरोपांवर शरद पवार म्हणतात...

पणजी : धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांवर आपला मुळीच विश्वास नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणालेत. पणजीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते. धनंजय मुंडेंप्रकरणी वाटल्यास चौकशी होऊ द्या. सत्य बाहेर येऊ द्या. त्या सर्व प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, चौकशी झाल्यानंतर सत्य समोर यायला हवे, असंसुद्धा शरद पवार म्हणालेत. (Sharad Pawar says on rape charges against Dhananjay Munde )

निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनलेला आहे: शरद पवार

धनंजय मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे, काही जणांसाठी बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनलेला आहे, अशी टीकासुद्धा शरद पवारांनी विरोधकांचे नाव न घेता लगावलीय. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झालीय. त्यातच धनंजय मुंडे यांनी रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला होता. पहिल्या बायकोपासूनची तीन मुले आणि करुणापासून झालेली दोन मुले अशी पाच मुले असल्याचं मुंडे यांनी स्वत:च कबूल केलं होतं. मुंडे यांनी त्यांच्या विवाहबाह्य संबंधाची कबुली दिली असली तरी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांची उमेदवारीही धोक्यात आल्याची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा होती.

काय आहे प्रकरण?

रेणू शर्मा महिलेनं धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. रेणू शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे. रेणू अशोक शर्मा असे तिचे संपूर्ण नाव आहे. “रेणू शर्मा यांच्या दाव्यानुसार, रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख 1997 मध्ये झाली. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्य प्रदेशातील इंदुरमध्ये बहीण करुणा शर्मा यांच्या घरी भेटले.

दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे : रेणू शर्मा

त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय 16-17 इतके होते. धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा 1998 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर 2006 मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदुरमध्ये गेली होती. त्यावेळी रेणू घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेंना माहिती होतं. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे.

याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच मला सांगितले की, जर तुला गायिका बनायचे असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेटवेन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला. तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.”

संबंधित बातम्या

बलात्कार प्रकरण भोवणार?; धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचं नेमकं काय होणार?

….. तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मुख्यमंत्रीही वाचवू शकणार नाहीत

Sharad Pawar says on rape charges against Dhananjay Munde