“ते महाशय स्वतंत्रपणे…”, राज ठाकरेंबद्दल संजय राऊत काय म्हणाले?

"जर हे लोक मराठी-मराठी करणारे महाराष्ट्रातल्या शत्रूंशी हात मिळवणी करणार असतील तर इतिहास महाराष्ट्राचा त्याला माफ करणार नाही", असेही संजय राऊत यांनी सांगितले.

ते महाशय स्वतंत्रपणे..., राज ठाकरेंबद्दल संजय राऊत काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 4:28 PM

Sanjay Raut On Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिला होता. लोकसभेच्या अनेक प्रचारसभेतही ते दिसले. पण आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी 225 ते 250 जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे. सध्या राज ठाकरे हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या राज ठाकरेंकडून राज्यातील विविध जागांसाठी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली होती. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

संजय राऊत काय म्हणाले?

“तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय ते महाशय 288 जागा स्वतंत्रपणे लढणार आहेत. त्यामुळे ही देवाणघेवाण चालूच राहते. ते स्वतंत्र लढणार असतील, तर त्या बदल्यात मुख्यमंत्र्‍यांनी काहीतरी द्यायला पाहिजे. त्या देवाणघेवाणाबद्दल चर्चा करण्यासाठी ते बंद दाराआड चर्चा करत असतील”, असे संजय राऊत म्हणाले.

“एका फार मोठ्या महाराष्ट्राच्या हितासाठी, सामाजिक कार्यासाठी कोणी भेटले असा काही त्यांचा इतिहास नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते अमित शाह यांना भेटले आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. मी कोणाचंही नाव घेत नाही. पण दोन्हीही वेळेला दोन वेगवेगळ्या पक्षांची सुपारी किंवा सहकार हे होताना दिसत आहे. महाराष्ट्राला मराठी माणसाच्या ताकदीचं खच्चीकरण करायचं, यासाठी जर हे लोक मराठी-मराठी करणारे महाराष्ट्रातल्या शत्रूंशी हात मिळवणी करणार असतील तर इतिहास महाराष्ट्राचा त्याला माफ करणार नाही”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

मनसेच्या 16 संभाव्य उमेदवारांची यादी

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईतील 36 विधानसभा जागेवर मनसेचे 16 संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली होती. यात शिवडी विधानसभेतून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच माहिम विधानसभा मतदारसंघातून नितीन सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे बोललं जात आहे.

तसेच मनसेचे कोकणातील नेते वैभव खेडेकर यांना खेड-दापोली-मंडणगड विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या राज ठाकरे हे विधानसभेच्या विविध मतदारसंघाची चाचपणी करत आहेत. यंदा विधानसभेला कोणाला आणि कशाप्रकारे तिकीट वाटप होईल, याचे निकष राज ठाकरेंनी सांगितले होते. यातील 35 जागांवर संभाव्य उमेदवार निश्चित झाल्याची माहिती समोर आली होती.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.