…तर उद्धव ठाकरेंऐवजी एखादा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता : दीपक केसरकर

राणेंकडे राजकीय प्रगल्भता नाही Shiv Sainik Would Have Become The Chief Minister Instead Of Uddhav Thackeray Says Deepak Kesarkar

  • विनायक वंजारे, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग
  • Published On - 16:56 PM, 1 Dec 2020

सिंधुदुर्गः भाजपने त्यावेळेस आपला शब्द पाळला असता तर उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नसते, त्यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असतं, असं विधान शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकरांनी केलं आहे. त्यावेळी महाराष्ट्रात सरकार स्थापन होतेय की नाही, अशी परिस्थिती होती. पवार साहेबांचा शब्द त्यांनी राखला आणि मुख्यमंत्रिपद स्वीकारलं, असंसुद्धा दीपक केसरकर म्हणाले आहेत. (Shiv Sainik Would Have Become The Chief Minister Instead Of Uddhav Thackeray Says Deepak Kesarkar)

सिंधुदुर्गात दीपक केसरकरांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत केली, त्यावेळी ते बोलत होते. ज्या राणेंना मराठीत दोन वाक्य साधी नीट बोलता येत नाहीत, त्यांनी उद्धव ठाकरेंवर चिखलफेक करावी एवढी त्यांची लायकी नाही, असं म्हणत राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेचा माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी समाचार घेतला. राणेंकडे राजकीय प्रगल्भता नाही, त्यांची मुळातच दृष्टी कलूषित म्हणूनच ते अशी कॉमेंट्स करत असतात. उद्धव ठाकरे हे अत्यंत संयमी नेतृत्व आहे, त्यामुळे राणेंनी स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे. राणेंनी ज्या ज्या योजना जाहीर केल्या, त्यातील एकही ते पूर्ण करू शकले नाहीत. एअरपोर्टची घोषणा त्यांनी केली, मात्र एक वीट ते लावू शकले नाहीत. सर्व अडचणी दूर करून तो एअरपोर्ट अस्तित्वात आणण्याचं काम आम्ही केलं.

शेवटी लोकांना दाखवण्यासाठी काम करायचं नसतं, असा टोला दीपक केसरकर यांनी राणेंना लगावला. आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या तुलनेत तुम्ही टिकू शकत नाही. तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होता, तेव्हा फक्त 80 कोटी रुपये आणत होता. मात्र मी साधा राज्यमंत्री असताना अडीचशे अडीचशे कोटी रुपये जिल्हा नियोजनासाठी आणले. मग कुठे आहे तुमची शक्ती?, केवळ माध्यमांना वेगवेगळ्या मुलाखती द्यायच्या आणि आपण कोण तरी मोठे आहोत, आपण काहीतरी मोठा विकास केला, असं भासवायचं. त्याकाळी जे कोकणात रस्ते झाले तेसुद्धा सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून आणले, मग तुम्ही पूर्ण केलेलं एक तरी काम दाखवा, असं खुलं आवाहन केसरकर यांनी राणेंना दिलं आहे. Shiv Sainik Would Have Become The Chief Minister Instead Of Uddhav Thackeray Says Deepak Kesarkar

दहा वर्षे तुम्ही मंत्री होता, तेव्हा तुम्ही स्वतःचं मेडिकल कॉलेज बांधलं, शासकीय मेडिकल कॉलेज का नाही आणलं, त्याचं उत्तर तुम्ही जनतेला दिलं पाहिजे. मग कशाला तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याच्या गोष्टी करता, असा टोलाही दीपक केसरकरांनी लगावला. साधं सिंधुदुर्गाचं नेतृत्व करू शकत नाही, ते आज उद्धव ठाकरे यांसारख्या संयमी नेतृत्वावर टीका करत सुटले आहेत, ज्यांनी बाळासाहेबानंतर शिवसेना टिकवली आणि बाळासाहेब असताना जेवढे आमदार निवडून येऊ शकले नाहीत, तेवढे त्यांनी भाजप सोबत नसताना निवडून आणले. पवार साहेबांच्या आग्रहाखातर त्यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं, असा पुनरुच्चारही दीपक केसरकरांनी केला आहे.

कोरोनासारख्या काळात त्यांनी केलेल्या कामाची दखल WHO ने घेतली आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा नेहमी ड्रायव्हरचं असतो. राज्याचा गाडा तो हाकत असतो आणि त्यामुळे कुशल ड्रायव्हर जर तो नसेल तर राज्याचा गाडा हा चुकीच्या दिशेने जाऊ शकतो आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या गाडीचं ड्रायव्हिंग स्वतः केलं म्हणून त्यांच्यावर टीका करणं यासारखी दुर्दैवी बाब कोणतीच नाही, अशी खरमरीत टीका केसरकर यांनी राणेंवर केली आहे.

Shiv Sainik Would Have Become The Chief Minister Instead Of Uddhav Thackeray Says Deepak Kesarkar

संबंधित बातम्या

सिंधुदुर्गाच्या वाट्याचे मंत्रिपद गेले, दीपक केसरकरांच्या नाराजीवर विनायक राऊत म्हणतात…..

अशोक चव्हाण किंवा दीपक केसरकरांची नाराजी काहीतरी पदरात पाडण्यासाठी, चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य