भाजपच्या निलंबित नगरसेवकाचा शिवसेनेकडून सत्कार, सुरेश पाटलांना बांधला भगवा फेटा

नगरसेवक सुरेश पाटील बोलण्याचा प्रयत्न करत असताना सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यनम यांनी बोलू न दिल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर सुरेश पाटील यांनी माईक फेकून दिल्याने त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. 

भाजपच्या निलंबित नगरसेवकाचा शिवसेनेकडून सत्कार, सुरेश पाटलांना बांधला भगवा फेटा
भाजपचे निलंबित नगरसेवक सुरेश पाटील
Follow us
| Updated on: Jun 20, 2021 | 12:07 PM

सोलापूर : भाजपचे निलंबित नगरसेवक सुरेश पाटील (Suresh Patil) यांचा शिवसेनेकडून भगवा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. सोलापूरमध्ये घोंगडे वस्तीतील नाल्याशेजारी असलेले अतिक्रमण पाडण्यावरुन भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांना सत्ताधारी भाजपसह विरोधकांनी एकाकी पाडले होते. महापौरांनी आपल्याच पक्षाचे नगरसेवक सुरेश पाटील यांना सभेतून निलंबित केल्यानंतर शिवसेनेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. (Shiv Sena felicitates suspended BJP MLA Suresh Patil in Solapur)

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन निलंबित नगरसेवक सुरेश पाटील यांचा सत्कार केला. अतिक्रमण काढण्यास विरोध करणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते, हे माहीत असताना अतिक्रमण वाचवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या नगरसेवकांचा हेतू काय असल्याचा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

नेमकं काय घडलं?

दोन दिवसांपूर्वी सोलापूर महानगरपालिकेच्या (Solapur Municipal corporation) सभेत मोठा गोंधळ झाला होता. सभेत बोलू न दिलाच्या कारणारून भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांनी माईक फेकून दिला होता. त्यानंतर महापौर श्रीकांचना यनम यांनी नगरसेवक सुरेश पाटील यांना सभेतून निलंबित केले होते.

सुरेश पाटील यांच्या प्रभागातील नाल्यावर असलेल्या बेकायदेशीर घरांच्या पाडकामाबाबत प्रश्नावरून शुक्रवारी सोलापूर महापालिकेत राडा झाला होता. सुरेश पाटील यांच्या पत्रावरुन बेकायदेशीर घरे हटवली जात असल्याचा आरोप काँग्रेस, एमआयएम आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला होता. त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी नगरसेवक सुरेश पाटील बोलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सुरेश पाटील यांना महापौर श्रीकांचना यनम यांनी बोलू न दिल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर सुरेश पाटील यांनी माईक फेकून दिला होता.

महापौर सहाय्यता निधीतून मदत

दरम्यान, सोलापूरमधील घोंगडे वस्ती अतिक्रमण प्रकरणी बाधित मिळकतदारांना महापौर सहाय्यता निधीतून मदत केली जाणार आहे. नाल्याचा सहा मीटर परिसर सोडून इतर जागेवर बांधकाम करण्यास परवानगी देण्याची घोषणा महापौर श्रीकांचना यनम यांनी केली आहे.

सत्ताधारी भाजपसह विरोधकांचा गोंधळ

घोंगडे वस्ती येथील अतिक्रमण प्रकरणी महापौरांनी सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक बोलावली होती. घोंगडे वस्ती येथील नाल्यावर अतिक्रमणानंतर करण्यात आलेले बांधकाम काढण्याचे पत्र भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिले होते. त्यानंतर महानगरपालिकेने पडताळणी करुन अतिक्रमण हटवले होते. मात्र अतिक्रमणाला अभय देण्यासाठी सत्ताधारी भाजपसह विरोधकांनी महासभेत गोंधळ घातला होता.

संबंधित बातम्या :

VIDEO : भाजप नगरसेवकाने माईक फेकला, बोलू न दिल्याने आक्रमक पवित्रा

(Shiv Sena felicitates suspended BJP MLA Suresh Patil in Solapur)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.