रावसाहेब दानवे भाजपचे अध्यक्ष असताना सर्वकाही सुरळीत होतं; राऊतांचा चंद्रकांतदादांना अप्रत्यक्ष टोला

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला कलगीतुरा सुरूच आहे. (sanjay raut)

रावसाहेब दानवे भाजपचे अध्यक्ष असताना सर्वकाही सुरळीत होतं; राऊतांचा चंद्रकांतदादांना अप्रत्यक्ष टोला
political leader

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला कलगीतुरा सुरूच आहे. राऊत हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, असा टोला पाटील यांनी काढल्यानंतर कुणाला माहीत नसताना पाटील मंत्री होऊ शकतात तर मी का नाही मोठ्या पदावर जाऊ शकत? असा सवाल राऊत यांनी केला. तसेच रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना सर्वकाही सुरळीत होतं, असा चिमटाही संजय राऊत यांनी काढला आहे. (shiv sena leader sanjay raut taunt chandrakant patil)

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचंही कौतुक केलं. तसेच दानवे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीला बोलावल्याचंही समर्थन केलं. मुख्यमंत्र्यांनी दानवेंना भेटायला बोलावलं आहे. ते केंद्रीय मंत्री आहेत. मीही त्यांना अनेकदा भेटतो. ते अजातशत्रू आहेत. दानवे सर्वांचे मित्रं आहेत. दानवे जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे अध्यक्ष होते. तेव्हा सर्व काही सुरळीत सुरू होतं, तेही खरं आहे, असं सांगतानाच त्यांना बोलावलं असेल तर चांगलं आहे. ते रेल्वे राज्य मंत्री आहेत. रेल्वेचे अनेक प्रश्न आहेत. मुंबईचे प्रश्न आहेत. राज्याचे प्रश्न आहेत. त्यावर चर्चा होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाशी कोणत्याही राज्याचा संवाद राहणं महत्त्वाचं आहे, असं राऊत म्हणाले.

अस्वस्थ मनामुळे नागालँडची ऑफर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसात बदल होणार असल्याचे संकेत दिले होते. पाटील यांच्या या विधानाची राऊत यांनी खिल्ली उडवली. त्या दोन दिवसातील 24 तास संपले. आता 24 तास राहिले आहेत. वाट पाहा. ते काय भूकंप करतात ते पाहा. चंद्रकांत पाटील महाविकास सामिल होऊ शकतात असं मुख्यमंत्र्यांच्या विधानवरून दिसू शकतं. तीन पैकी एका पक्षात ते प्रवेश करू असं पाटील यांना वाटत असेल, म्हणून त्यांना माजी राहणार नाही असं म्हटलं असावं. मुख्यमंत्र्यांनीही पाटील तीन पैकी एका पक्षात प्रवेश करतील असं सांगितलं आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे ते नागालँडमध्ये जाणार आहेत. राज्यपाल म्हणून. त्यांच्या अस्वस्थ मनामुळे त्यांना नागालँडच्या राज्यपालपदाची ऑफर दिली आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

पाटील मंत्री होऊ शकतात, मग…

संजय राऊत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, असं विधान पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा त्यांनी समाचार घेतला. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो ना. मराठी माणूस काहीही होऊ शकतो. जर महाराष्ट्राला माहीत नसताना चंद्रकांत पाटील मंत्री होऊ शकतात तर राऊत आणि शिवसैनिक कोणत्याही पदावर जाऊ शकतात, असा टोला त्यांनी लगावला. (shiv sena leader sanjay raut taunt chandrakant patil)

 

संबंधित बातम्या:

उद्धवजींना ‘रिअलाईज’ झाल्यामुळेच आम्हाला भावी सहकारी म्हणाले असावेत : देवेंद्र फडणवीस

आधी ईडी, मग सीबीआय, आता इन्कम टॅक्सकडूनही अनिल देशमुखांवर धाडी!

चंद्रकांत पाटील तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार असं माझ्या कानावर आलंय : उद्धव ठाकरे

(shiv sena leader sanjay raut taunt chandrakant patil)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI