मुख्यमंत्र्यांवरच्या नारायण राणेंच्या टीकेला शिवसेनेचं प्रत्युत्तर; वैभव नाईक म्हणतात…

काल खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. या टीकेला शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय. (

  • विनायक वंजारे, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग
  • Published On - 22:53 PM, 25 Feb 2021
मुख्यमंत्र्यांवरच्या नारायण राणेंच्या टीकेला शिवसेनेचं प्रत्युत्तर; वैभव नाईक म्हणतात...
Vaibhav Naik narayan rane

सिंधुदुर्गः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेते नारायण राणेंचा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी चांगलाच समाचार घेतलाय. विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नसल्यामुळे कोरोनाचा बाऊ करून अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मुख्यमंत्री पळ काढत असल्याची टीका काल खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. या टीकेला शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय. (Shiv Sena responds to Narayan Rane criticism of CM says Vaibhav Naik )

एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून काही गोष्टी कराव्या लागतातः वैभव नाईक

कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. नारायण राणे काय बोलतायत त्याकडे लक्ष देण्याची मुख्यमंत्र्यांना गरज नाही. तर लोकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून ज्या गोष्टी कराव्या लागतील, त्या उद्धव ठाकरे करत आहेत.

लोकांची सुरक्षितता महत्त्वाची आहेः वैभव नाईक

लोकांनीसुद्धा त्या मान्य केल्या आहेत. मर्यादित स्वरूपात लग्न समारंभ, कार्यक्रम व्हावेत आणि गर्दी कमी व्हावी यासाठी लोकही आता प्रयत्न करतायत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला लोकही प्रतिसाद देतायत. त्यामुळे राणे काय बोलतायत याकडे लक्ष देण्याची गरज नाही. लोकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि ती योग्य प्रकारे उद्धवजी पार पाडत आहेत.

राणेंच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही

गेलं अधिवेशनसुद्धा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पार पडलं होतं आणि येणारे उन्हाळी अधिवेशन एक मार्चला सुरू होतेय, ज्या प्रमाणे ठरलंय त्या प्रमाणे हे अधिवेशन पार पडेल. आजच पार्लमेंटरी कमिटीची बैठक मंत्रालयात होतेय, त्यामुळे निश्चितच हे अधिवेशन पार पडणार असल्याचं वैभव नाईक यांनी सांगितलं आहे. मात्र नारायण राणेंनीच गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या गोष्टीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राणेंच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचा पलटवार वैभव नाईक यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

कुडाळमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, राणेंच्या बंगल्यावर शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपप्रवेश

राणेंकडे दहा वर्ष मंत्रिपद, पण त्यांना शिवसेना संपवता आली नाही, वैभव नाईकांचा निशाणा

Shiv Sena responds to Narayan Rane criticism of CM says Vaibhav Naik