शिवसेना भाजपचा ‘बंगाली’ इलाज करणार? राऊतांची मोठी घोषणा

संजय राऊत लवकरच पश्चिम बंगालचा दौरासुद्धा करणार आहेत.

  • दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 19:04 PM, 17 Jan 2021
शिवसेना भाजपचा 'बंगाली' इलाज करणार? राऊतांची मोठी घोषणा

मुंबईः शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केलीय. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करून ही माहिती दिलीय. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पक्षानं हा निर्णय घेतलाय, अशीही माहिती संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे. तसेच संजय राऊत लवकरच पश्चिम बंगालचा दौरासुद्धा करणार आहेत. (Shiv Sena To Contest West Bengal Assembly Elections; Big Announcement By Sanjay Raut)

विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुका भाजप, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि काँग्रेसबरोबरच ओवेसींची पार्टी AIMIM सुद्धा लढणार आहे. संजय राऊतांनीही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालंय. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत 100 जागा लढवणार असल्याचीही माहिती समोर आली होती.

शिवसेनेनंही पश्चिम बंगालमध्ये 100 जागांवर निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे यंदा पश्चिम बंगालच्या निवडणुकीत वेगळीच रंगत येणार आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा पश्चिम बंगालचा दौरा करू शकतात. शिवसेना कोलकाता, हुगळी, दमदमसह अनेक भागांत आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकते.

कोणीही काहीही करा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच जिंकणार : संजय राऊत

शिवसेनेनं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार केल्यानं त्याचा भाजपला फटका बसू शकतो. भाजपनं या निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावलीय. शिवसेनेनं 2019मध्येही बंगालमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवले होते. त्यावेळी शिवसेना आणि भाजपा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटकपक्ष होते. पण शिवसेना महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये ताटातूट झाली. शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण पावलानं अनेक पक्षांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण ओवैसी यांच्या पश्चिम बंगालमधील एंट्रीनंतर शिवसेनेच्या संजय राऊतांनीही सूचक प्रतिक्रिया दिली होती. कोणीही काहीही करा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच जिंकणार, असंही संजय राऊत म्हणाले होते.

ओवेसींच्या पक्षाचं भवितव्य काय?, राऊतांचा सवाल

ममतादीदींचा राजकीय अनुभव मोठा आहे. देशात ज्या पद्धतीनं AIMIM निवडणुका लढवत आहे आणि मतांचं ध्रुवीकरण करत आहे. त्यामुळे देशातील नागरिकांच्या मनात नक्कीच आशेचा किरण निर्माण होत असेल, पण त्यांच्या पक्षाचं भवितव्य काय आहे, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केलाय. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये नक्कीच ममता बॅनर्जी विजयी होतील, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या

AAP आणि AIMIM नंतर शिवसेना यूपीमध्येही पंचायत निवडणुका लढवणार; पक्षाची जोरदार तयारी

Congress : महाआघाडी सरकारमध्ये ऑल इज नॉट वेल? ठाकरे सरकारविरोधात काँग्रेसची चक्क दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स?

Shiv Sena To Contest West Bengal Assembly Elections; Big Announcement By Sanjay Raut