Ramdas Kadam | रामदास कदमांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवलं? तिकीट वाटपाचे अधिकार अनिल परबांकडे, सूत्रांची माहिती

रत्नागिरीतील (Ratnagiri) मंडणगड, दापोली नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याकडे देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

Ramdas Kadam | रामदास कदमांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवलं? तिकीट वाटपाचे अधिकार अनिल परबांकडे, सूत्रांची माहिती
Ramdas Kadam_Anil Parab
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 11:40 AM

रत्नागिरी : राज्यात नगरपंचायत निवडणुकांची (Nagar Panchayat Election) रणधुमाळी सुरु झालीय. रत्नागिरीतील (Ratnagiri) मंडणगड, दापोली नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याकडे देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानपरिषद निवडणुकीची उमदेवारी डावलल्यानंतर मंडणगड आणि दापोलीतील निवडणुकीची जबाबदारी अनिल परब यांच्याकडे देणं हा रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यासाठी धक्का मानलं जातं आहे. रामदास कदम यांना ऑडिओ क्लिप प्रकरण पुन्हा भोवल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

तिकीट वाटपाचे अधिकारही अनिल परब यांच्याकडे

शिवसेनेनं मंडणगड दापोली नगरपंचायत निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी अनिल परबांकडे दिल्याची सूत्रांची माहिती आहे. परब यांनाच तिकीट वाटपाचे अधिकार देण्यात आले आहेत.

रामदास कदम, योगेश कदम यांच्यासाठी निवडणूक महत्त्वाची

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड या दोन नगरपंचायतींचे निवडणुकीचे बिगुल वाजलंय. या दोन्ही नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस आहे. दापोली आणि मंडणगड या नगपंचायतीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम आणि शिवसेना आमदार योगेश कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

ऑडिओ क्लिप प्रकरण नेमकं काय?

काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सर्व मटेरीयल हे शिवसेनेचेच नेते रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप मनसेचे स्थानिक नेते वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यावर शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. टीव्ही 9 मराठी या क्लिपची पुष्टी करत नाही. पण ज्या दोन ते तीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यात त्यात, परबांच्याविरोधात जी ईडीनं कारवाई केली त्यावर कदम वाह वाह म्हणताना दिसत आहेत. एवढंच नाही तर प्रसाद कर्वे हा रामदास कदमांचा कार्यकर्ता एकाच वेळेस कदम आणि सोमय्यांच्या संपर्कात होता असंही दिसतं होतं. मात्र, या ऑडिओ क्लिपशी आपला संबंध नसल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं होतं.

निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

अर्ज दाखल करणे: 1 ते 7 डिसेंबर अर्जांची छाननी : 8 डिसेंबर मतदान : 21 डिसेंबर सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 निकाल : 22 डिसेंबर

इतर बातम्या:

औरंगाबादेत भगवा दिनाच्या उपक्रमाला पहिल्यांदाच ब्रेक! शिवसनेने महाआरती टाळली, भाजप नेत्यांनाही रोखले!

वरळीत सिलिंडर स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी

Shivsena gave all rights to Anil Parab take decision of Mandangad and Dapoli Nagar Panchayat Election on the place of Ramdas Kadam reported by sources

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.