Maharashtra Politics | वर्षावर भयाण शांतता, सागरला उत्साहाचं भरतं, क्षणा-क्षणाला प्रचंड घडामोडी, सोमवारचे चित्र सत्तापालटाचे संकेत?

आतापर्यंत भाजपच्या गोटामध्ये नेमके काय सुरु आहे याचा अंदाजही येत नव्हता. पण एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाविकास आघाडीचा पाठींबा काढून घेताच राजकीय घडामोडींना वेग येत आहे. त्यामुळे भाजपाचे नेते आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जात असल्याचे चित्र आहे. पाठिंबा काढल्याचे वृत्त येताच गिरीश महाजन, आशिष शेलार यांनी सागर बंगला जवळ केला होता.

Maharashtra Politics | वर्षावर भयाण शांतता, सागरला उत्साहाचं भरतं, क्षणा-क्षणाला प्रचंड घडामोडी, सोमवारचे चित्र सत्तापालटाचे संकेत?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला
राजेंद्र खराडे

|

Jun 27, 2022 | 12:46 PM

मुंबई :  (Eknath Shinde) एकनाथ शिंदे गट हा आपल्या निर्णयावर ठाम राहत सोमवारी या गटातील 38 आमदारांनी (MVA) महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढलेला आहे. गेल्या सात दिवसांमध्ये शिंदे गटातील आमदार नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले होते. आता शिंदे गटाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर विरोधी पक्षनेते (Devendra Fadnvis) देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपा नेत्यांमध्ये खलबते सुरु झाली आहेत. एरवी राज्याच्या राजकारणात वर्षा बंगल्याला महत्व असते पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा बंगला सोडून मातोश्री जवळ केलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर कमालीचा शुकशुकाट तर सागर बंगल्याला उत्साहाचं भरतं आल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात केव्हा काही होईल याचा अंदाज कोणीही करु शकत नाही.

भाजपा नेत्यांमध्ये उत्साह

आतापर्यंत भाजपच्या गोटामध्ये नेमके काय सुरु आहे याचा अंदाजही येत नव्हता. पण एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाविकास आघाडीचा पाठींबा काढून घेताच राजकीय घडामोडींना वेग येत आहे. त्यामुळे भाजपाचे नेते आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जात असल्याचे चित्र आहे. पाठिंबा काढल्याचे वृत्त येताच गिरीश महाजन, आशिष शेलार यांनी सागर बंगला जवळ केला होता. आतापर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणवीस यांनीही या राजकीय उलथापालथीवर वक्तव्य केलेले नाही. पण आता भाजप पक्ष आणि विरोधी पक्षनेते हे अॅक्शनमोडमध्ये येणार असे चित्र आहे.

वर्षा नव्हे सागर चर्चेच्या केंद्रस्थानी

वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असले तरी यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे निवास सोडले असून आपला मुक्काम मातोश्रीवर केला आहे. तर दुसरीकडे सागर हे विरोधी पक्षनेत्याचे निवसस्थान आहे. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणीही कमालीचा शुकशुकाट होता. पण बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेताच राजकीय घडामोडीला वेग आला आहे. यामध्ये आता भाजपाची भूमिका महत्वाची राहणार आहे. त्याचअनुशंगाने सागर बंगल्याला महत्व आले आहे. भाजप नेत्यांची रेलचेल सुरु झाली आहे. त्यामुळे एवढ्या दिवसांपासून शांतता असलेला भाजप पक्ष काय खेळी करणार हे पहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे शिंदे गटाचा दावा?

एकनाथ शिंदे गटातील 38 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे सेनेतील 2 तृतीअंश आमदार हे आपल्यासोबत असून आता सरकार हे अल्पमतामध्ये आल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे बंडखोर आमदार काय करणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून भविष्यातील त्यांची रणनिती काय असणार हे पहावे लागणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें